चांदुर रेल्वे /
मागील दोन वर्षापासून कोरोना काळात बंद झालेल्या शालिमार एक्सप्रेस, अमरावती जबलपुर एक्सप्रेस ,या गाड्या चांदुर रेल्वे स्थानकावर थांबा बंद करण्यात आला. त्यामुळे चांदुर रेल्वे येथे शिक्षण घेण्याकरिता येणाऱ्या विद्यार्थी ,तसेच येथील व्यापाऱ्यांचे हाल होत आहे
या दोन्ही गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्या ,यासाठी शहरातील भाजपा कार्यकर्ते यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जालना येथे जाऊन भेट घेऊन त्यांना गाडी थांबवण्यासाठी निवेदन देण्यात आले.
चांदुर रेल्वे शहरातील व तालुक्यातील नागरिकांची अनेक दिवसापासून कोरोना काळात बंद झालेल्या दोन्ही गाड्या पूर्ववात सुरू करावा, यासाठी अनेकदा वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांना निवेदने दिली, अनेकदा त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांनी व शहरातील नागरिकांनी भेटी घेतल्या, मोठे मोठे आंदोलने झाले ,तरीसुद्धा या निगरगट्टा रेल्वे प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही, त्यामुळे शहरातील भाजपा कार्यकर्ते यांनी थेट रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्यांची जालना येथे जाऊन भेट घेऊन वरील दोन्ही गाड्या चांदुर रेल्वे स्थानकावर थांबण्यात याव्या यासाठी निवेदन दिले व चर्चा केली.
यामध्ये भाजपा कार्यकर्ते तसा मा नगरपरिषद उपाध्यक्ष शंकर मानकांनी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा,संचालक बंडूभाऊ मुंधडा, मा, नगरसेवक सचिन जयस्वाल, दिलीप भैसे, अनिल मोटवानी यांनी निवेदन दिले.
Home चांदुर रेल्वे रेल्वे थाब्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी घातले रेल्वेमंत्र्यांना साकडे जालना येथे जाऊन रावसाहेब...