संकल्प शेतकरी संघटनेच्या वतीने पर्वेश कदम यांचा वाढदिवस साजरा आदिवासी विकास शाळेमध्ये सामाजिक दायित्वाची जाण ठेवत विद्यार्थ्यासमवेत अभिष्टचिंतन सोहळा वृद्धाश्रमातही अन्नदान करत दिला सामाजिक संदेश

0
28
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनीधी / अमरावती

शहरातील नितीन कदम यांचे चिरंजीव पर्वेश कदम हे नेहमीच समाजातील गरजवंतांच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसतात, कोरोना काळात केलेली मदत असो किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेले सेवाकार्य असो, त्यांची सेवाभावी कार्य नेहमीच सुरू असतात.बडनेरा शहर व ग्रामीण भागातील सामाजिक सेवा कर्याकरिता कदम कुटुंब नेहमीचं अग्रेसर असल्याचे विविध माध्यमांद्वारे महितीस येते.याच त्यांच्या सामाजिक कार्याचे विशेष उदाहरण आज नितीन कदम यांच्या मुलानेही वडिलांच्या पावलावर पाऊल देतं सामाजिक कार्याचा दाखला दिला.सामाजिक आदिवासी,गरीब व गरजू मुलांना नवीन कपडे, स्कूल बॅग, शालेय वस्तू व खाऊ वाटप करुन साजरा केला. पर्वेश कदम यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून गरीब, गरजू मुलांना आवश्यक भेटवस्तू देण्याचा नितीन कदम यांच्या व संकल्प शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात आला. त्याप्रमाणे त्यांनी भातकुली तालुक्यातील आदिवासी विकास संस्थेच्या शाळेतील एकूण ४०० विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट म्हणून दिल्या. यावेळी लहानग्यांचा चेहऱ्यावरीला आनंद पाहण्यासारखा होता. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये नवनवीन शालेयपयोगी वस्तू आल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याचप्रमाणे भरदिवसा शाळकरी विद्यार्थ्यांसोबत पर्वेश कदम यांनी वाढदिवस साजरा केल्यानंतर सांध्य प्रांताला आणखी एका सामाजिक उपक्रमाची भर पाडली.

आपला वाढदिवस एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाऊन साजरा केला जावा, ही प्रत्येकाची मनीषा असते. मात्र या सगळ्या कल्पनेला बाजूला सारून आपला वाढदिवस हा वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत साजरा केला जावा , अश्या आशयाची कल्पना नितीन कदम यांचे चिरंजीव पर्वेश कदम यांना सुचली. त्याचप्रमाणें ५० पेक्षा अधिक वृद्ध नागरिक असलेल्या वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात अन्नदान व गोड पदार्थाचे वाटप तसेच वृद्धांसाठी ब्लँकेट, चटई प्रदान करण्यात आले. यावेळी वृद्धजनांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता.
या वाढदिवसानिमित्त पर्वेश कदम यांनी राबवलेल्या सामाजिक कार्यासाठी सर्वत्र त्यांचे कौतुक होतांना दिसून येत आहे. यावेळी नितीन कदम व पर्वेश कदम यांच्यसह अक्षय धुळस रोहित हनुमंते, राजदीप ठाकुर, योगेश वऱ्हेकर , गोपाल टाले, भा.शहर प्र. प्रफुल महल्ले, विनोद पतलीया, सुभाष बांते, सागर पंचबुद्धे, मोहन भातुकुलकर, गजानन धनवाडे, पिंटू भाऊ होले, मयूर देशमुख, ललित लांडे, आकाश मानकर, बाबूलाल वानखडे, अर्पण भजपुजे, वासुदेव तिडके, संगीता ताई शिंदे, स्वाती माकोडे, पांडे मॅडम, निशाताई कदम, करूणाताई कदम, वैष्णवी कदम, स्मृती पोटे धुळस, हर्षिता कावरे व आदि मान्यवर उपस्थित होते.उपस्थित सर्व कार्यकर्ते व उपस्थितांचे पर्वेश कदम यांनी आभार मानले.

पर्वेश कदम :
असा उपक्रम प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त राबवला पाहिजे. माझे वडील नितीन कदम यांच्या सामाजिक सेवाकार्याला प्रेरित होऊन आज या वाढदिसानिमित्त सामाजिक उपक्रमाची आम्हाला प्रेरणा मिळाली.त्यांच्यामुळेच सेवाकार्य करण्याची आम्हाला ऊर्जा मिळते.आज तरुण पिढी वाढदिवस फ्लेक्स बोर्ड, पार्टी अशा पद्धतीने साजरा करते. आपण सर्व संकल्प शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविला जो वाढदिवस साजरा केला, त्याने समजात चांगला संदेश जाईल.

दक्षिण भारतातही नितीन कदम यांचे चिरंजीव पर्वेश कदम यांचा वाढदिवस साजरा

दक्षिण भारतातील हैदराबाद शहरात पर्वेश व नितीन कदम यांच्या सामाजिक सेवकार्याला प्रेरित होऊन गोरगरीब लहानशा मुलांना केक, गोड पदार्थ व जेवणाचे डबे वाटप ‘ पडाला देवी मनिकांत रेड्डी ‘ नामक युवकाने केलें.

veer nayak

Google Ad