विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस संघर्ष संघटनेची निषेध सभा संपन्न…..

0
201
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती.मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त गोपाल दहीवडे चारघळ प्रकल्पातील हरिश्चंद्र खांडेकर तसेच वरुड तालुक्यातील दाभी प्रकल्पातील चांदस येथील निखिल सेवलकर या अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या न्याय व हक्कासाठी शासन प्रशासनाशी लढताना शासनाच्या उदासीन धोरणामुळे व आपल्यावर झालेल्या अन्यायामुळे हतबल होऊन अखेरीस आत्महत्या करुन आपली जिवणयात्रा संपवली ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून शेकडो धरणे ऊभी करण्यासाठी शासनाला मदत केली अशा शेतकऱ्यांची राज्यकर्त्यांच्या कुप्रवृतीमुळे आत्महत्या झाली खरं तर हि आत्महत्या नसुन सरकारने केलेली हत्याच आहे असे मत विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांनी व्यक्त केले.आज अमरावती येथे विदर्भातील संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सर्किट हाऊस येथे निषेध सभा पार पडली.या दरम्यान संघटनेच्या वतीने विभागिय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला ५० हजार रुपये आर्थिक मदत व परिवारातील एका सदस्याला सरकारी नोकरी तात्काळ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तथा विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सरळ खरेदी व नोकरी विषयक समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी १५ जानेवारी हि तारीख राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिली होती.त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संघटनेने नागपूर येथील बर्डी चौकातील हजारो प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे घेण्यात आले होते.परंतू दिलेले आश्वासन सरकारने पाळले नसून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल केली सल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.म्हणून येत्या आठ दिवसांत सरकारने बैठक घेऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सदर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदना द्वारे विनंती केली असून तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातुन देण्यात आला आहे.यावेळी सदर कार्यालया परिसरात प्रकल्पग्रस्तांनी शासनाच्या विरोधात नारेबाजी करून शासन प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी संघटनेचे अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण, सचिव सुनील घटाळे, सहसचिव अजय भोयर भुषण चौधरी, अमरावती जिल्हाध्यक्ष प्रशांत मुरादे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन मलमकार, अकोला जिल्हाध्यक्ष डॉ भगवान पंडित, संजय गीद अभय जैन,शरद खलोकार,राजु लोनकर, मनोजभाऊ तंबाखे,प्रमोद खाडे, संजय धोंडे, धनराज पंडित, महादेवराव ठाकरे, रामेश्वर मेटे अनिल खेडकर, राजु खेडकर, दिलीप कदम, सचिन गोमकाळे नरेश वाहणे,अन्नाजी सोनवणे,श्री चकोले, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष शेख हबीब भाई.तथा संघटनेचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

veer nayak

Google Ad