श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शैक्षणिक संस्था द्वारा संचालित स्कुल ऑफ स्कॉलर्स येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या प्राचार्या के साई नीरजा व पर्यवेक्षिका शबाना खान यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षकांनी
महात्मा गांधी यांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या के साई नीरजा, आयोजन समिती आणि ब्ल्यू हाऊस सदस्यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.