स्थानिक जुना धामणगाव – मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या ग्रंथाच्या निर्मितीच्या उद्देशाने व लहान मुलांमध्ये संस्कार निर्माण व्हावे. आजचा युवक सुसंस्कार संपन्न व्हावा त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी म्हणून आजच्या युगाची संजीवनी ग्रामगीता ग्रंथ आहे.
वंदनीय तुकडोजी महाराजांनी युवकांसाठीच नव्हे तर समाजाला व राष्ट्रहिताला योग्य तरुण निर्माण व्हावा या उद्देशाने विविध ग्रंथ निर्माण केले असून त्यामध्ये ग्रामगीता हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. जीवन विकास परीक्षा गुरुकुंज आश्रम मोझरी अंतर्गत घेतली जाते. आज दिनांक 28 जानेवारी रोजी डॉक्टर मुकुंदराव के पवार शैक्षणिक संकुलामध्ये 620 विद्यार्थ्यांनी या परीक्षेमधे भाग घेतला होता. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव शिवाजीराव पवार ,समन्वयक जया केने, प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला, उपप्राचार्य दीप्ती हांडे ,अधीक्षक हनुमंत ठाकरे ,अधीक्षिका नम्रता बोरकर ,अधीक्षक हरिविजय युनाते उपस्थित होते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करून संकल्प गीताने परीक्षेची सुरुवात झाली. ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व केंद्रप्रमुख म्हणून कार्य सांभाळले. शाळेचे शारीरिक शिक्षक महेश धांदे अंकुश डुकरे ,अजय सुलताने यांनी परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणून कार्य सांभाळले. या परीक्षेच्या नियोजनासाठी वीर शिवबा वस्तीगृह व राजमाता वस्तीगृह शिक्षकांनी सहकार्य केले. त्यामध्ये नम्रता बोरकर , योगिता डहाके, पल्लवी सोनवणे, दामिनी घाटे, निकिता भगत, सुनिता जोशी ,संगीता मलाधरी, ऋतिक काकडे ,अजय सुलताने ,अंकुश डुकरे ,महेश धांदे ,श्रेयस लयस्कर , राहुल देशमुख प्रेमांशू जवादे , निखिल दामोदर ,हर्षल पाटील ,रवी भगवे, रवी मारबदे ,अंजली डोंगरे, शुभांगी नैताम ,संचीता कोल्हे इत्यादी शिक्षक उपस्थित होते. परीक्षा संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून शांतीपाठ घेण्यात आला व राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा शेवट झाला.