स्थानिक जुना धामणगाव- डॉक्टर मुकुंदराव पवार यांनी लावलेले संस्कार रुपी वृक्ष म्हणजे सैनिकी शाळा आज सैनिकी शाळेला दहा वर्षे पूर्ण होत आहे, व ज्यांनी या संकुलाची निर्मिती केली ते संस्थापक डॉक्टर मुकुंदराव पवार साहेब यांना शंभर वर्ष पूर्ण झाल्याने, त्यांची जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती येथील कर्नल विश्वासराव काळे साहेब उपस्थित होते, त्यासोबतच त्यांच्या पत्नी डॉक्टर अनुराधा काळे उपस्थित होत्या, प्रमुख अतिथी म्हणून विलास बुटले,विश्वासराव केने, अरुणराव राऊत, संस्थेचे सचिव शिवाजीराव पवार, समन्वयक जया केने, प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला, उपप्राचार्य दीप्ती हांडे कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अमर जवान स्मारकाला मानवंदना देऊन करण्यात आली संस्थेचे संस्थापक डॉक्टर मुकुंदराव पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले, त्यानंतर पाहुण्यांकडून ध्वजारोहण झाले राष्ट्रगीत संपन्न झाले. कर्नल विश्वासराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनात परेड निरीक्षण झाले. परेड निरीक्षणानंतर शाळेच्या आठशे विद्यार्थ्यांनी परेड पथसंचालन केले. सर्व पालकांचे लक्ष या परेडने वेधून घेतले होते, संस्थेचे प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल्यानंतर विविध साहसी खेळ मल्लखांब, जुडो कराटे, लाठी काठी, रायफल शूटिंग, नृत्य यावेळी विद्यार्थ्यांनी पाहुण्यांसमोर सादर केले . सोबतच विविध देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले, संस्थेला दहा वर्षे पूर्ण झाल्याने व मुकुंदराव पवार यांच्या जन्म शताब्दी निमित्याने कर्मचाऱ्यांचा सेवा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये माया काळे, ओम राऊत ,सचिन पोटे, राहुल नाकाडे, वैशाली कळंबे, मंजुषा विलायतकर, हनुमंत ठाकरे, बेबी काळे, सीमा गावंडे, अरुणा उके इत्यादींना सेवा सन्मान देऊन गौरविण्यात आले. सोबतच दरवर्षीप्रमाणे आदर्श विद्यार्थ्यांची निवड केली जाते त्यामध्ये अक्षरा गुल्हाने व एकांश व्यवहारे यांची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आली, कोमल फुफुटे व अमित बेठेकर यांनाही आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झाला. आमच्या संकुलातील धारणी प्रकल्पातील विद्यार्थी गणेश भुसूम हा महाराष्ट्र व केंद्र स्तरावर चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम आला त्याबद्दल त्याला सकाळ वृत्तपत्राच्या वतीने सन्मानचिन्ह व रोख राशी देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे दरवर्षी संकुलामध्ये आदर्श शिक्षिका पुरस्कार दिला जातो त्यामध्ये श्रद्धा चवरे यांना यावर्षीचा सन्मान प्राप्त झाला. सोबतच वस्तीगृहयुक्त शाळा असल्याने मुलांची उत्कृष्टरित्या देखभाल व व्यवस्थापन म्हणून आदर्श रेक्टर म्हणून काजल मुन यांना सन्मानित करण्यात आले.
ज्या विद्यार्थ्यांचा जन्मदिवस होता त्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जन्मदिवस चांगला करण्यात आला. प्रजासत्ताक दिना निमित्ताने विविध विद्यार्थ्यांनी भाषण दिले. विवान पवार, हार्दिक नेरले व अन्य विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. कार्यक्रमाला माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विश्वासराव काळे साहेब यांनी आपल्या भाषणामध्ये संकुलाचा गौरव केला. देशाचा भरभक्कम पाया म्हणजे विद्यार्थी आणि तो विद्यार्थी सैनिकाच्या माध्यमातून तयार करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य डॉक्टर मुकुंदराव पवार यांनी केलं, अस कार्य म्हणजे ईश्वराची देणगीच होय असं वक्तव्य यावेळी विश्वासराव काळे साहेबांनी दिलं मला कार्यक्रमाला मिलिटरी ट्रेनर व स्पोर्ट विभाग महेश धांदे, प्रतीक दिवेकर, निखिल दामोधर, हर्षल पाटील, रोशना गेडाम, प्रेमांशू जवादे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाला यशस्वीते साठी शितल मोहोड, आरती ठाकरे, संगीता बाळस्कर, अनुजा ढोक, नेतल जगताप, निकिता ठाकरे, भाग्यश्री बिजवे, प्रगती पाटील, हर्षदा भेंडारकर, अर्चना तापडिया, योगेश चवात राहुल नाकाडे, संजय मसराम, श्रेयस लायस्कर, हनुमंत ठाकरे, राहुल देशमुख, रवी भगवे, रवी मारबदे ऋतिक काकडे, महेश डोहाळे नम्रता बोरकर व सर्व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन सरिता मलिये यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जयप्रकाश कपले यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानानी करण्यात आला. कार्यक्रमाला बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता, कार्यक्रमानंतर माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला त्यामध्ये संस्थेमध्ये गेल्या दहा वर्षापासून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.