अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ,गुरुकुंज मोझरीद्वारे आयोजित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभाग अंतर्गत श्रीगुरुदेव सेवा मंडळ,कावली व ला.मु.राठी विद्यामंदिर कावली यांच्या संयुक्त विद्यमाने कावली गावामध्ये ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे आयोजन ला.मु.राठी विद्यामंदिर कावली येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री सुधाकर मसराम तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री नितिन टाले, श्री राजकुमार जांभळे, श्री अशोकराव तितरे,श्री निळकंठ भोंगाडे, श्री लक्ष्मणराव मानकर, अभिजित ठाकरे ,ग्रामगीताचार्य निलेश मोहकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या फोटो चे पुजन व हारार्पण करण्यात आले. ‘गुरुदेव हमारा प्यारा’ संकल्पगीत गाऊन रीतसर परीक्षेला सुरुवात करण्यात आली.
मुख्याध्यापक श्री सुधाकर मसराम सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लिखित ग्रामगीता या ग्रंथाचे विद्यार्थ्यांमध्ये वाचन,लिखाण व चिंतन व्हावे व आपले जीवन ग्रामगीतेच्या तत्वप्रणालीनुसार सुसंस्कारीत व्हावे या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेश परीक्षा,परिचय परीक्षा,प्रविण परीक्षा, ग्रामनाथ परीक्षा, ग्रामगीतारत्न परीक्षा या विविध गटामधून तब्बल ९० विद्यार्थ्यांनी या परिक्षेमध्ये सहभाग घेतला.राष्ट्रवंदना घेऊन परीक्षेचा समारोप करण्यात आला व शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या संपूर्ण परीक्षेच्या आयोजनासाठी व यशस्वीतेसाठी श्री रमेशराव ठाकरे गुरुजी, केंद्रप्रमुख श्री निळकंठ भोंगाडे व ग्रामगीताचार्य निलेश मोहकार यांनी अथक परिश्रम घेतले.