धामणगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त सलग १६ वर्षे रक्तदान शिबिर

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे – समाजसेवेचा मोठा जागर उपक्रम

धामणगाव रेल्वे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सलग १६ वर्षांपासून अखंडपणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, हा उपक्रम परिसरातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरला आहे.

नगरपरिषद प्रांगणात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. या वेळी एकनिल ब्लड सेंटर यवतमाळ तर्फे ऑनर सागर रोडकर व त्यांची चॅमु उपस्थित होती.

दरवर्षी येथील शिबिरात शेकडो रक्तदाते सहभाग नोंदवतात, त्यामुळे विविध रुग्णालयांना आवश्यक तेवढा रक्तसाठा उपलब्ध करून देण्यात मोठी मदत होत आहे. “बाबासाहेबांच्या मानवतावादी विचारातून प्रेरणा घेऊन समाजासाठी काहीतरी देण्याचा हा प्रयत्न असल्याचे” आयोजकांनी नमूद केले.

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग व आयोजनकर्त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा उपक्रम धामणगावची सामाजिक परंपरा म्हणून ओळख मिळवत आहे.

✨ रक्तदान उपक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे

प्रविण हेंडवे, प्रशांत मुन छंदक हगवने , मंगेश सोनोने, ज्योती पाटील, सुनील ढाणके, , संजय तुपसुंदरे, आनंद राय, दादु मेश्राम, प्रेम मोटघरे, छगन जाधव, राहुल हाडे, शैलेश बोरकर, विलास पाटील, निलेश पाटील, डॉ. पंकज कवाडे, भिमराव सहारे, अजय तुपसुंदरे, राज वहिले, मिलिंद वहिले, अमित फुलझेले, अल्पेश बनसोड, मंगेश भुजबळ, चेतन कोठारी, संदिप रामटेके, कोहिनूर श्रीरामे, बंडू मडामे, शुद्धोधन सोनोने, , वैभव तुपसुंदरे, किशोर दहाट, जय मुळे, अमर खडसे, मुकुंद सोनोने, आर्यन सोनोने, अनुज सोनोने, शुभम सोनोने, शुभम हेंडवे, मेहुल मोहड, मयुर जांभुळकर, राजकुमार धाकटे यांनी विशेष मेहनत घेतली.

veer nayak

Google Ad