शासकीय मुलींची निवासी शाळा हिंगणगाव येथे संविधान महोत्सव अंतर्गत सामाजिक न्याय विभाग अंतर्गत सरोज आवारे यांनी संविधान सापसीडी उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व व मूल्यतत्त्व अधिकार यांची सांगड घालून संविधानाचे महत्त्व पटवून दिले संविधान सापसीडी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत व अधिकार या विषयावर बोलके केले अशा सुंदर उपक्रमांच्या माध्यमातून संविधानाचे महत्त्व सामाजिक न्याय विभाग अंतर्गत सरोज आवारे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले

तसेच संविधान रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे प्रतिसाद देऊन संविधानाचे महत्त्व रांगोळीच्या माध्यमातून सुंदर अशी मांडणी केली धामणगाव रेल्वे येथे वेगवेगळ्या ठिकाणी महाविद्यालय ,निवासी शाळा संविधान महोत्सव वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून संविधान सप्ताह साजरा करण्यात आला सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य द्वारे संविधानाचे महत्त्व नागरिकांना समजावण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक न्याय विभागा अंतर्गत सरोज आवारे मुख्याध्यापक बोरे सर ,चौधरी मॅडम ,सावळेकर सर, सावळेकर मॅडम ,आकरे मॅडम, मेश्राम सर, वाकेकर मॅडम व विद्यार्थ्यी वर्ग.

















