सकल बंजारा आरक्षण कृती समितीचा धडक मोर्चा अनुसूचीत जमातीच्या यादीत समावीष्ट करण्याची केली मागणी.

0
19
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी,प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवीले निवेदन

पारंपारिक वेषभुषेत हजारो बंजारा बांधव झाले हाते सहभागी 

 आर्वी,दि.८:- सकल बंजारा आरक्षण कृती समितीने मंगळवारी (ता.सात) धडक मोर्चा काढून येथील उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवुन बंजारा समाजाला अनुसूचीत जमातीच्या यादीत समाविष्ट करा अशी मागणी केली आहे. या मोर्च्यात आर्वी विधानसभा क्षेत्रातील हजारो बंजारा बांधव पारंपारिक वेषभुषेत सहभागी झाले होते यामुळे या मोर्चाला आगळवेगळे रुप प्राप्त झाले होते. 

 निजाम प्रांतातील हैदराबाद गॅझेट मध्ये सन १९०१ ते १९४८ पर्यंत बंजारा व तत्सम जमातीची नोंद असुन आरक्षण सुध्दा देण्यात आले आहे. मात्र १९५६ नंतर राज्य पुनर्रचने दरम्यान विदर्भासह मराठवाडा, खानदेशाचा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे मुळचे असलेले अनुसूचीत जमातीचे आरक्षण संपुष्टात येवुन विमुक्त-जातीच्या (विजा-अ) संवर्गात रूपांतरित करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील बंजारा व तत्सम समाजावर एस.टी. आरक्षणाबाबत मागील पंच्याहत्तर वर्षांपासून घोर अन्याय करण्यात आला आहे. हा अन्याय दुर करण्याकरीता महाराष्ट्रातील बंजारा व तत्सम जमातींना सी. पी. एंड बेरार, नागपूरचे शासन आदेश आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे एस.टी. योजना, सवलती लागू केल्याची अधिसूचना निर्गमित करून संविधानाच्या ३४२(२) नुसार अनुसूचित जमातींच्या आरक्षण यादीत टक्केवारी स्वतंत्रपणे समावेश करण्यात यावा. याशिवाय हैद्राबाद गॅझेट व सी-पी बेरार अधिसुचना लागु करावी, आयोगांच्या शिफारसी तातडीने मान्य कराव्यात. अनुसूचीत (ब) असा स्वतंत्र उपवर्ग तयार करावा आदि मागण्यासुध्दा या निवेदनाच्या माध्यमातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आल्या आहे. निवेदन उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांच्यावतीने नायब तहसीलदार उमेश चव्हाण यांनी लोकांमध्ये येवुन स्वीकारले. 

यावेळी, पल्लवी जाधव (चांदणी) राजेश राठोड दहेगाव मुस्तफा, नागपुर येथील प्रा. डी. बी. चव्हाण, आत्माराम राठोड, दशरथ जाधव आदिंनी मार्गदर्शन केले. संचालन महेश देवशोध यांनी केले. 

 निवेदन, आर्वी, पाचोड (ठाकुर), हर्रासी, हिवरा, बेल्हारा, राजणी, चांदणी, बोथली, तरोडा, दहेगाव (मुस्तफा), कवाडी, गव्हाणखेडी, कारंजा तालुक्यातीलह गारपीट, पांजरा (बंगला), आष्टी तालुक्यातील मोई व राणवाडी येथील बंजारा समाजाच्यावतीने स्वतंत्रपणे देण्यात आले आहे. या मोर्चा सुमारे पंधारेशेच्यावर बंजार समाजाच्या महिला, पुरूष, युवक, युवती यांनी सहभाग घेतला. 

 कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता आपले सर्व राजकीय संबंध, संघटन, गट-तट दुरसारुन प्रत्येक गावातील वयोवृध्द, मध्यमवर्गी तथा तरुण, तरुणींनी रात्रंदिवस परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad