समाजसेवक लॉयन संजय वर्मा यांचा उपक्रम..
मूकबधिर आश्रम येथे लॉयन्स क्लबच्या वतीने जेवण व मिठाईचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात लॉयन्स क्लबचे धामणगाव अध्यक्ष रितेश राठी सचिव कमल टावरी कोषाध्यक्ष प्रवीण तलवारे तसेच समाजसेवक संजय वर्मा उपस्थित होते. आश्रमातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व आनंद व्यक्त केला. समाजोपयोगी कार्याच्या माध्यमातून लॉयन्स क्लबने सामाजिक बांधिलकी जपली असून, भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमात आश्रमातील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. समाजोपयोगी कार्याच्या माध्यमातून लॉयन्स क्लब सतत सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
समाजसेवक लॉयन संजय वर्मा यांनी सांगितले की, “समाजातील प्रत्येक घटकाला सण-उत्सवाचा आनंद मिळायला हवा. या हेतूने आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे.स्थानिक नागरिकांनी या कार्याचे कौतुक केले असून अशा सामाजिक उपक्रमांनी समाजातील जिव्हाळा आणि आत्मीयता वाढीस लागते, असे मत लॉयन्स क्लबचे धामणगाव अध्यक्ष रितेश राठी यांनी व्यक्त केले.