0
20
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आज दिनांक 2 ऑक्टोबर 2025 वार गुरुवारला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा वडगाव राजदी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

      उपरोक्त कार्यक्रमात लायन्स क्लब धामणगाव रेल्वे यांच्या सौजन्याने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर चित्रकला स्पर्धा ही दोन गटात घेण्यात येऊन विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच लायन्स क्लब धामणगाव रेल्वे यांच्यातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.

 

    स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता रॅली काढण्यात आली तसेच परिसर स्वच्छ करण्यात आला.

      या कार्यक्रमप्रसंगी वडगाव राजदी येथील सरपंच श्री समीर हांडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजु वालदे लायन्स क्लब धामणगाव रेल्वेचे अध्यक्ष रितेश राठी, सचिव कमल टावरी, कोषाध्यक्ष प्रवीण तलवारे तसेच लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य सुरेशजी लोया रामरावजी अतकरे,योगेश, मुंदडा विशाल पनपालिया,आशिष पनपालिया,पवन राठी, मेहेर निस्ताने इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य उमेश हांडे, चंदू तुपट, दौलतराव तुपट सोबतच जिल्हा परिषद शाळा वडगाव राजदी येथील मुख्याध्यापिका कुमारी पद्मा कुबडे,शिक्षक किरण वानखडे राम चव्हाण,मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी रिंकू हांडे इत्यादी उपस्थित होते.

        लायन्स क्लब धामणगाव रेल्वेचे अध्यक्ष श्री रितेश राठी यांनी विद्यार्थी हितासाठी आयोजीत उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल लायन्स क्लब तर्फे जि प शाळा वडगांव राजदी येथिल मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांचे आभार मानले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच समीर हांडे यांनी लायन्स क्लब राबवीत असलेल्या उपक्रमाचे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून कौतुक केले.

        कार्यक्रमाचे संचालन वडगाव राजदी येथिल शिक्षक श्री किरण वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राम चव्हाण यांनी केले

veer nayak

Google Ad