आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : दादासाहेब गवई कनिष्ठ महाविद्यालय परतवाडा येथ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. पियुष रमेशराव अवथळे यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक साहित्यरत्न पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. आर्वी येथील रहिवासी असलेले प्राध्यापक आपल्या अकाउंटींग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करून व विविध विध्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन विध्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे आर्वी चे सुपुत्र पियुष रमेशराव अवथळे यांना शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल आदर्श शिक्षक साहित्यरत्न या पुरस्काराने सनम्मानित करण्यात आले. 28 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये शिक्षण सचिव (महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. पियुष रमेशराव अवथळे यांनी शासनाचे तसेच प्रोग्राम यशस्वी रित्या पार पाडण्याकरीता नेमलेल्या बी द चेंज फाउंडेशनचे आभार मानले आहे.