धामणगाव रेल्वे पोलीसांचा रूट मार्च : दुर्गाउत्सव काळात शांतता व सुव्यवस्थेसाठी प्रशासन सज्ज

0
12
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे : शहरात सुरू झालेल्या दुर्गाउत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली, एच.डी.पी.ओ. साहेब चादूर रेल्वे व ताथोड यांच्या देखरेखीखाली स्थानिक पोलीस स्टेशनतर्फे आज भव्य रूट मार्च काढण्यात आला.

या संचलनाचे नेतृत्व ठाणेदार गिरीश तातड यांनी केले. पोलीस दलाचे जवान शहरातील मुख्य मार्ग, चौक व वस्ती भागातून शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत गेले. या दिमाखदार संचलनामुळे नागरिकांत सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला.

प्रशासन सज्ज : चौक-चौरस्त्यांवर विशेष लक्ष. गर्दीच्या भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त. दिवस-रात्र गस्त व पेट्रोलिंगची व्यवस्था

नागरिकांना आवाहन

दुर्गाउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव जपावा. अफवांवर विश्वास ठेवू नये, आणि अडचण आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

veer nayak

Google Ad