धामणगाव रेल्वे येथे श्री तुलजा भवानी नवरात्रोत्सवाला सुरुवात

0
79
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

तुलजाई नगर येथील श्री तुलजा भवानी संस्थानात सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी घटस्थापना विधीने नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. शुभारंभ श्री. राजेंद्र पाडेकर परिवार यांच्या हस्ते झाला.

 

नवरात्रोत्सवानिमित्त दररोज हरिपाठ, सकाळी-सायंकाळ कीर्तन, भजन, तसेच दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २५ सप्टेंबर रोजी धार्मिक व सामाजिक विशेष कार्यक्रम होणार आहेत.

उत्सवाची सांगता बुधवार, दि. १ ऑक्टोबर रोजी दुपारी महाप्रसाद व सायंकाळी घट विसर्जनाने होईल. या काळात अखंड ज्योती संकल्प योजना, नगरप्रसाद व शाश्वत शेव संकल्प योजना राबविण्यात येणार आहेत.

संस्थानातर्फे सर्व भाविकांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad