भावपूर्ण श्रद्धांजली

0
29
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

मेरी प्यारी बहना…

शैलजा तू रविवार, 31 ऑगस्ट 2025 च्या ब्रम्हमुहूर्तावर आम्हा सर्वाना अचानक सोडून गेली. तू मागील दोन वर्षांपासून दुर्धर आजाराशी झुंज देत होती. या काळात तुझ्यातील संयम, हिंमत व समाधानी वृत्ती दिसून आली. तू नेहमीच वर्तमान स्थितीत जगली. तुझ्यातील स्वाभिमानी वृत्तीमुळे तू कधीच स्वतःच्या अडचणी दिसू दिल्या नाही. तुला नौकरी करतांना खुप अडचणींचा सामना करावा लागला परंतू डगमगली नाहीस.

 शैला तू आपल्या भावंडामध्ये सगळ्यात लहान होतीस परंतु कर्तृत्वाने मोठी होतीस. तु कनिष्ठ महाविद्यालय,

 नेरपिंगळाई येथे इंग्रजी विषयाची शिक्षिका होती. तुला या आधी नोकरी निमित्त चिंचोली व दर्यापूर येथे राहावे लागले. नोकरीनिमित्त अपडाऊन करावे लागले.

 गांधींजयंती, 2 ऑक्टोबर तुझा जन्मदिवस.त्यामुळे तुझा स्वभाव सुद्धा शांत व संयमी होता. तू कोनामध्ये फारशी मिसळली नाही. तुझ्या फार ठराविक मैत्रिणी व नातेवाईकांशी जमायचे. मोठया बहिणीच तुझ्या मैत्रिणी होत्या. आपल्या बाबाचे निधन झाल्यानंतर आपण कुटुंबातील सर्वजण एकोप्याने राहून प्रगती साधत गेलो. बाबा गेल्यानंतर आक्काची समर्थ साथ आपल्या सोबत होती. तीचे मार्गदर्शन व कणखर विचार तसेच बाबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने आपण सर्वच बाबी पूर्ण करू शकलो. आक्का तुझ्या सोबत शेवटच्या क्षणापर्यंत सावलीसारखी राहिली. शैला तुझ्या आजारपणात इंगळे व कोरडे कुटुंबातील सदस्यांचे व आपल्या सर्व नातेवाईकांचे पुरेपूर सहकार्य व प्रेम लाभले. प्रत्येकाने तुझ्या आयुष्यासाठी ईश्वराला प्रार्थना केली. शैला तू स्वतःचा संसार उभा केला. क्रिष्णा व आरव या दोन गोंडस मुलांना जन्म दिला. आज त्यांना तुझी गरज असतांना तू दुर निघून गेलीस. शैला तू कधीच स्वतःचे दुःख व अडचणी दिसू दिल्या नाही. आम्ही तुला भेटलो की चेहऱ्यावर समाधानी असायची. तुला कधीच चुकीच्या गोष्टी आवडल्या नाही. कुटुंबातील प्रत्येकाने आपले सेवाकार्य पार पाडले.

 शैला आपण दोघेही शिवपरिवारात नोकरीला असल्याने मलाही थोडे सहकार्य. तुला करता आले. तू या आजारातून नक्की बाहेर पडशील याचा तुला पूर्ण विश्वास होता कारण कोणाजवळही तू शेवटपर्यंत. कोणतीच चिंता व्यक्त केली नाही. उलट समोरच्याला समाधान देत राहिली. त्यादिवशी सगळ्यांना टाटा करशील अशी पुसटशी कल्पना कोणाला येऊ दिली नाही. शेवटी ईश्वराला जे मान्य होते तेच झाले.

असे म्हणतात “जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला” हेच खरे आहे.

तुझ्या आत्म्याला चिरशांती लाभो व आम्हा सर्वाना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हिच परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना

                       तुझाच दादा,

                     किशोर जा. इंगळे

                  (Mob:9975242485)

veer nayak

Google Ad