आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : तालुक्यातील शेतकरी बांधवांनी यंदा हंगामी पीक सोयाबीन कपाशी या पिकासाठी अहोरात्र कष्ट केले असून आज शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र परिसरातील चांगलेच पाहायला मिळत असून गेल्या काही दिवसापासून झालेल्या अनियमित पाऊस हवामानातील अस्थिरता तसेच कीड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे
शेतकऱ्यांनी खते बियाणे औषधी व तसेच मजुरी यावर मोठा खर्च करून पीक उभं केलं मात्र आज त्यांच्या डोळ्यात देखत पिकाची नासाडी होत असल्याचे शेतकरी हतबल झाले आहेत या पिकाचा खर्च तर परत मिळाला नाहीच परंतु उलट कुटुंब चालविण्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा येऊन ठेपला आहे मात्र शासनाकडे शेतकऱ्यांसाठी कोणतीही मदत मिळाल्याचे दिसून येत नाही
याकरिता शेतकऱ्यांच्या व्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे यांच्याकडे आर्वी तालुक्यातील मौजा आष्टा बोरगाव जाम गोईवाडा टोकिवाडा मांडला शिरपूर खडकी या परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली व शेतातील झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली याची तात्काळ दखल घेत जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे यांनी दिनांक 12.9.2025 रोजी तहसीलदार हरीश काळे यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून पिकाची नुकसान भरपाई करून देणे बाबत सांगितले
आर्वी तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून न्याय व आर्थिक मदत करण्यात यावी
शेतकऱ्यांना अडचणीतून दिलासा मिळावा म्हणून विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे सोयाबीन पिकाला योग्य हमीभाव देऊन तातडीने खरेदी केंद्र सुरू करावीत शेतकऱ्यांचे शेती कर्ज व त्यावरील व्याज माफ करून कर्जाचा भार हलका करावा अशी शासनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज भासत असून शेतकऱ्यांना न्याय मिळावा असे नाही झाले तर शेतकरी आणखी कर्जबाजारी होतील व आत्महत्येचा घटनेत वाढ होईल आणि त्याची जबाबदारी शासन वरच राहील
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही शासनाने तातडीने उपयोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागेल असे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले तर निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष शंकर पोटफोळे, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे, अभिनव पंचगडे, विकास डोळस, विनोद वाघमारे, गौरव कुरेकर, प्रविण काळे, प्रवीण लांबाळे, रितेश जांगडे, केलास सिंघइ, शेतकरी बांधव महादेव बेंद्रे, अशोक गोमाशे, महेश मेंद्रे, शिवदास गोमाशे, विलास जगनाडे, हरदेव साठे, अमोल आसोले व इतर शेतकरी उपस्थित होते.