करोडो खर्चून तीन महिन्यातच रस्ता खड्ड्यात!

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

कंत्राटदाराचा निकृष्ट दर्जा – सार्वजनिक बांधकाम विभागावर दुर्लक्षाचे गंभीर आरोप

ग्रामस्थांचा संताप, रस्ता रोको आंदोलनाने प्रशासनाला धडक!

रामगाव (प्रतिनिधी) –

करोडो रुपयांचा निधी खर्च करून अवघ्या तीन महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला रामगाव–धामणगाव रस्ता आज अक्षरशः खड्डेमय झाला आहे. जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे रस्त्यावर १ ते २ फुटांचे खोल खड्डे पडले असून, प्रवाशांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे. या भयानक स्थितीमुळे ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून त्यांनी रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला.

ग्रामस्थांचा ठाम आरोप आहे की, रस्ता बांधताना कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आणि काम लेवलाव पद्धतीने उरकले. एवढेच नाही तर कामाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक डोळेझाक केली. परिणामी करोडो रुपयांचा निधी पाण्यात गेला असून नागरिकांचे पैसे अक्षरशः वाया गेले आहेत.

याशिवाय, १० टन क्षमतेच्या रस्त्यावर ३० ते ७० टन जड वाहनांची वाहतूक दिवसरात्र सुरू आहे. नियमांचे उल्लंघन होऊनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, ही मोठी शंका उपस्थित करणारी बाब आहे.

ग्रामस्थांच्या ज्वलंत मागण्या

जड वाहनांसाठी तातडीने पर्यायी मार्ग तयार करावा.

रस्ता निकृष्ट दर्जाचा करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा व ब्लॅकलिस्ट करावे.

गुणवत्तेची चौकशी करून रस्ता नव्याने बांधावा.

क्षमतेपेक्षा जड वाहनांना बंदी घालून कठोर कारवाई करावी.

ग्रामस्थांचा इशारा : “जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढे आणखी तीव्र आंदोलन उभे राहील!”

veer nayak

Google Ad