लायन्स क्लब व राणे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

0
93
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान तर ७५ रुग्णांची नेत्र तपासणी करून १५ रुग्णांची मोफत मोतीयाबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड

आर्वी, प्रतिनिधी / पंकज गोडबोले

आर्वी : येथे दि.१०/०९/२०२५ ला आयनाेक्स हॉल मध्ये लाॅयन्स क्लब आर्वी व राणे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान व मोफत नेत्र रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबीराची सुरुवात लायन्स इंटरनेशनल चे माजी प्रांतपाल व लायन्स क्लब आर्वी चे संस्थापक अध्यक्ष डॉ. रिपल राणे व इतर मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली होती. 

७५ नेत्र रुग्णांची तपासणी करून त्यांना डोळ्यांच्या ड्रॉप्स व इतर औषधी मोफत वाटप करण्यात आली तसेच मोतीबिंदू असनार्या १५ मोतीया बिंदू असणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करून लाॅयन्स सेवाग्राम आय हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले व या नेत्र शिबिरामध्ये विविध तपासण्या करून सर्व रुग्णांना मोफत औषध उपचार करण्यात आले. 

मानवी जिवनाला रक्ताची अत्यंत गरज आहे गरजेच्यावेळी नेमाका रक्ताचा तुटवडा निर्माण होतो याची जाण ठेवुन लॉयन्स क्लब आर्वीच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरात ३५ इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याच्या भावनेतून रक्तदान केले. या ठिकाणी सर्व रक्तदात्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला डाॅ. रिपल राणे, एँड. सुरेंद्र जाने, , प्रमोद नागरे, निलेश लाडके, पंकज गोडबोले, सुशील अवचार, देशमुख सर, डॉ. कालिंदी राणे मॅडम , डॉ दिपक चव्हाण , संगीता ढबाले , सुनिता जाणे, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

veer nayak

Google Ad