दिनांक १०/९/२०२५ धामणगाव रेल्वे तालुका महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जी जगताप यांच्या नेतृत्वात जन सुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी तहसील कार्यालय ठिय्या आंदोलन

0
49
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा शाहू फुले आंबेडकरांना मानणारा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने जन सुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करून राज्यपालाच्या संमतीसाठी राखून ठेवले आहे त्या विधेयकामुळे महाराष्ट्रात राजकीय विरोधी पक्षनेते सामाजिक संघटना पत्रकार सरकारविरोधी भूमिका मांडणारे यांना टार्गेट करून या कायद्यामध्ये त्यांना अडकून लोकशाही संपवण्याचा घाट या सरकारने रचला आहे संविधानाच्या माध्यमातून सामान्य जनतेला जो अधिकार मत व्यक्त करण्याचा दिला आहे तो हिसकवण्याचा यामध्ये प्रयत्न आहे जे सामाजिक संघटना विरोधी राजकीय पक्ष सरकारविरोधी भूमिका घेतल्यास त्यांना कोणत्याही विचारात न घेता त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकणे त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करणे अशा पद्धतीने अडकून अजामीन पत्र गुन्हे दाखल करता येणार आहे त्यामुळे तुम्हाला जमानत सुद्धा या कायद्यांतर्गत मिळणार नाही व तुम्हाला न्यायालयातूनच खटला लढावा लागेल अशा पद्धतीचा काळा कायदा हा राज्य शासन आनु इच्छित आहे अशा कायद्याचा उपयोग नक्षलवादी कारवाया तसेच देश विरोधी आतंकवादी यांच्या बाबतीत केल्यास आमची कोणती हरकत नाही परंतु तुम्ही विरोध प्रदर्शन करणाऱ्या व शासन चुकीच्या बाबीवर बोट ठेवून विरोध केल्यास असे गुन्हे दाखल करत असेल तर हे लोकशाहीला घातक आहे २०२५ महाराष्ट्र विधिमंडळामध्ये मंजूर झालेल्या विधेकाची सखोल समीक्षा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली त्या समितीकडून सदर विधेयकावर हरकती व सूचना मागवण्यात एकूण हरकती व सूचना १२७५० प्राप्त झाल्या त्यापैकी ९५०० पेक्षा जास्त हरकती विधेयक रद्द करण्या च्या बाजूने होत्या याचा सर्व विचार करण्यात यावा त्यामुळे धामणगाव रेल्वे तालुका महाविकास आघाडी तर्फे या कायद्याला विरोध करण्यासाठी हा विरोध दर्शवण्यासाठी माननीय तहसीलदार मार्फत राज्यपालांना व मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज वानखडे, शिवसेना उभाठा गटाचे नाना देऊळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार कट तालुका अध्यक्ष मंगेश ठाकरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कैलास ठाकरे, भाकपा तालुका सचिव श्रीकृष्ण सडमाके, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदीप मुंदडा, कार्याध्यक्ष चंदू डहाणे, महिला अशा अध्यक्षा मंजुश्री राठी, महिला तालुकाध्यक्ष अनिता मेश्राम ,माजी शहराध्यक्ष नितीन कनोजिया, युवक काँग्रेस शहराध्यक्ष आशिष शिंदे, गजानन चवरे, यशवंत बोरकर, सुनील भोगे, नंदकुमार मानकर, रवींद्र डबले, मुकुंद माहोरे, मुकेश राठी, गोपाल मोकलकर, संतोष गावंडे, रवींद्र काटणकर, संजय गाडे, नंदू ढोले, संकेत उभाळ, राधेश्याम चांडक, अविनाश इंगळे, भाऊराव अडकणे, भाऊराव बमनोटे अविन मांडवणे, शेख नुरभाई देविदास धारणे, अशोकराव कडू, दिनकरराव जगताप, मनोज वेरुळकर, हेमंत कडू, भगवान शिंदे, विजय सराफ, विलास चौधरी, तेजस दुबे, सुरेश कांबळे, लोकेश शेंडे, प्रशांत सबाणे, मुकेश राठी, हरिचंद्र वानखडे, सचिन समोसे, विठ्ठल सपाटे, मंगेश ढाले, संदीप जाधव, प्रशांत वानखडे, हेमराज तितरे, संदीप दावेदार, संजय धामंदे, प्रकाश कुरिले, सचिन काकडे, विपिन ठाकरे, सुरेंद्र जयस्वाल, विजय काळे, ओम प्रकाश हरवानी, रुपेश गुल्हाने, रमेश ठाकरे, प्रकाशराव वाडे, सुभाष उडाके, चंदू बोधिले, अमोल भेंडे, यावेळी महाविकासा आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

veer nayak

Google Ad