श्री धर्मेद्रजी लोया यांना लोकमत गौरव सन्मान कर्तुत्वाचा पूरस्काराने सन्मानित

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

शेतीच्या जिव्हाळ्यापोटी मुंबईतली नोकरी सोडून आपल्या गावी परत येणाऱ्या तळेगाव दशासर येथील शेतकऱ्याचं नाव आहे… धर्मेंद्र राधेश्याम लोया

धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या तळेगाव दशासर इथं ते गेल्या ३० वर्षांपासून शेती करत आहेत. बारावीत मेरिट आणि केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवूनची त्यांनी शेती करणंच पसंत केलं. वडिलांकडून आधुनिक शेतीचा वारसा घेतलेल्या धर्मेंद्र लोया यांना राज्यपालांच्या २००४-२००५ या वर्षीचा ‘उद्यान पंडित’ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आपल्या १०० एकर शेतात ते आवळा, निलगिरी आणि चिंच अशी पिके घेऊन चांगलं उत्पन्न मिळवतात.

आपल्या शेतात त्यांनी औषधी वनस्पतींचे देखील प्रयोग केले आहेत. मुलांना झाडांचं महत्त्व सांगणं, त्यांच्यासाठी वनभोजन सहल आणि त्यांच्या मनात निसर्गाविषयीची ओढ निर्माण करण्याचंही मोठं काम करतात
आज त्यांना अमरावती हॉटेल ग्रँड मेफिल इन येथे लोकमत, अमरावती गौरव सन्मान कर्तुत्वाचा या पुरस्काराने जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया ,लोकमत चे समूह संपादक विजय बाविस्कर सामाजिक कार्यकर्ते लप्पी सेठ जाजोदीया यांच्या हस्ते गौरविण्यात आले…खूप खूप अभिनंदन

veer nayak

Google Ad