आमदार दादाराव केचे यांनी घेतलेल्या दहीहंडीला प्रचंड प्रतिसाद

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

कमी वेळात दहीहंडी फोडण्याचा विक्रम फ्रेंड्स ग्रुप, धामणगावनी मिळविले प्रथम १,५१,०००/- रू. बक्षीस

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : आर्वीत दरवर्षीप्रमाणे यंदाही गोकुळ अष्टमी निमित्त परंपरेला खंड पडू न देता विधान परिषद सदस्य आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नातून “देवाभाऊ दहीहंडी व सांस्कृतिक महोत्सव २०२५” चे आयोजन आर्वी येथील गांधी चौकात करण्यात आले. लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव या स्पर्धेत झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार दादाराव केचे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उपेंद्र कोठेकर (संघटन मंत्री, विदर्भ प्रांत भाजप), श्री. संजय गाते (जिल्हाध्यक्ष भाजप), माजी खासदार श्री. रामदास तडस, श्री. अनुप जयस्वाल (अध्यक्ष, विदर्भ प्रांत बजरंग दल), भाजप प्रदेश सचिव सौ. सरिताताई गाखरे, माजी नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुल्हाणे, श्री. अनिल जोशी, श्री. हनुमंत चरडे, सौ. नीताताई गजाम, सौ. रोशनीताई ढोबाळे, सौ. आम्रपालीताई बागडे, श्री. राजाभाऊ गिरधर आदी मान्यवर उपस्थित होते.

दहीहंडी पूजनाने स्पर्धेची सुरुवात झाली. व्यासपीठावर राजू हिवशे, विनय डोळे, सुरेश मोटवाणी, विष्णू सवाई, सुरेश नागपूरकर, सचिन गावंडे, अमोल पवार, दादा गाडगे, सो. दुर्गेशताई पुरोहित, सो. उर्मिलाताई पवार, गोडबोले, नारायण लोडे, मनीष उभाळ आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन नंदू वैद्य व आवेज खान यांनी केले तर आभार विनय डोळे यांनी मानले.

स्पर्धेत मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील नामांकित गोविंद पथकांनी सहभाग घेतला.
त्यात फ्रेंड्स ग्रुप धामणगाव यांनी अवघ्या ५३.८५ सेकंदांत दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक मिळवत ₹१,५१,१०१ चे बक्षीस पटकावले.
तर शिव तांडव गोविंद पथक, शिरजगाव यांनी ५७.०८ सेकंदात दहीहंडी फोडून ७१,१०१/- रू. चे द्वितीय पारितोषिक मिळविले.
इतर सर् व ७०००/-रू. तसेच शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
इतर सर्व पथकांना प्रोत्साहनपर रोख पारितोषिके २१,०००/- रू, ११,०००/- रू. चे बक्षीस देण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमात “जाऊ द्या घरि आता वाजले की बारा” व “पाटलाचा बैलगाडा” या लावणी नृत्य सादरीकरणावर महिलांनीही ठेका धरला.

या महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी मयूर पोकळे, प्रवीण पवार, अमित शिंगाणे, विकी पवार, चेतन तिरभाने, दिनेश लायचा, विकी राठोड, ऋषी गुल्हाणे, गौरव कुऱ्हाडे, हर्षल शेंडे, प्रीतम लोखंडे, संकेत वेरुळकर, मनोज गुल्हाणे, विशाल राऊत, नितीन येत्ते, गजू कदम, सुनील लोखंडे, नुरकी महाराज, नवाज मलिक, विजय गिरी, प्रवीण वानखेडे, लवेश गलोले, सुनील धुळे, श्याम काळे, अमित अंभोरे, अमोल पांडे, रोशन राऊत, आजीम फारुकी, सोहेल शेख, निखिल खोंडे, अशोक चिमोटे, सागर निर्भळ, रितेश रेंडके, मोहनभाऊ पावडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad