ग्रामपंचायत तळेगाव दशासर अंतर्गत वार्ड क्रमांक चार मधील स्मशानभूमीचे अतिशय निकृष्ट झालेले बांधकाम.

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

ग्रामपंचायत तळेगाव दशासर अंतर्गत वार्ड क्रमांक चार मधील स्मशानभूमीचे अतिशय निकृष्ट झालेले बांधकाम याविषयी ग्रामस्थांनी ग्राम विकास अधिकारी यांना पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी देयक अदा केले त्यानंतर ग्राम विकास अधिकारी यांना कामाचा दर्जा दाखवायला घेऊन गेलो असता त्यांनी एमबी सीसी ही पंचायत समिती चे बांधकाम इंजिनिअर आखरे साहेब यांनी केली असे सांगितले आम्ही

त्यांना विचारले साहेब आम्ही तुम्हाला फक्त बिल न काढण्यासाठी सांगितले होते असा अर्ज पण आम्ही ग्रामपंचायतला दिलेला आहे तरीसुद्धा तुम्ही बिल काढले कसे असे सांगितले व ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांच्या दबावाला बळी पडून तक्रार करते यांचे वर ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव दशासर यांनी गुन्हे दाखल केले. वारंवार पंचायत समिती सोबत भेटी घेऊन पत्रव्यवहार करून झालेल्या कामाची चौकशी झाली नाही परंतु तक्रार करते यांना अंगावर गुन्हेच लावून घ्यावे लागले जनतेच्या समस्या मार्गी लावण्यास पंचायत समिती धामणगाव रेल्वे प्रशासन तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग अमरावती अपयशी ठरत आहे संबंधित कामाचे संदर्भात अधिकारी वर्गाकडून काही अधिकारी व ठेकेदारांना वाचवण्यासाठी कामात दिरंगाई होताना दिसत आहे अशीच दिरंगाई पुढे होत राहिल्यास गावकरी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहे

veer nayak

Google Ad