प्रतिनिधी : धामणगांव रेल्वे
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन शाखा धामणगाव रेल्वे तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव थाटात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी इस्कॉन शाखा धामणगांव रेल्वे कडून श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्य विविध कार्यक्रम करून साजरा करण्यात आला .आरोही रिसॉर्ट, लुनावत नगर येथे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज तसेच श्रीकृष्ण कृपामूर्ती ए.सी भक्ती वेदांत स्वामी श्रीलं प्रभुपाद यांच्या आशीर्वादाने, श्रीमान उद्धव प्रभुजी भागवताचार्य श्री वृंदावन धाम यांच्या सुमधुर वाणीतून भगवान श्रीकृष्ण जन्म कथा भक्तांना श्रवण करावयास मिळाली .युगधर्म कीर्तन दास, ब्रजेश्वर दास यांनी सुद्धा भक्तांना कृष्ण लीला कथा सांगितली . जीवन कसे भक्तिमार्गाने जगावे याचे उपदेश केले .या कार्यक्रमात भजन संध्या, हरिनाम संकीर्तन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम ,कृष्ण लीला आधारित नृत्य व नाट्य चिमुकल्यांकडून सादर करण्यात आली. अभिषेक, कथा, जन्मोत्सव, किर्तन व नृत्य अशा कार्यक्रमाचे आयोजन दामोदर दुलाल दास (दिनेश बुधलानी) यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते .कार्यक्रमात मोठ्या संख्येत महिला ,पुरुष ,युवक युवती ,बालक कृष्ण भक्तांनी हजारोच्या संख्येत उपस्थिती लावली होती. हरे कृष्ण हरे राम नामाच्या गजर करीत श्रीकृष्ण प्रेमींनी मनमोकळेपणाने नृत्य केले. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .हजारो भक्तांनी महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला. दामोदर दुलालदास प्रभू (दिनेश बुधलानी) प्रतापसिंग यादव, संजय काळे, बंडू सावरकर, प्रवीण पोतदार, दिलीप भागवत, विनोद बुधलानी, कुकरेजा परिवार, बुधलानी परिवार, नरेंद्र साकुरे, दीपक साकुरे ,संपूर्ण साकुरे परिवार, शंकरराव नेवारे, प्रणवजी लूनावत ,देव बुधलानी, हर्षित कुकरेजा ,राममूर्ती यादव ,चेतन कोठारी , कमलभाऊ छांगाणी,नीलिमा बुधलानी ,शारदा साकुरे ,मंदा साकोरे, जया भागवत, सोनू पालीवाल, माया शिंदे, माधुरी साकुरे, ललीता बागडे,रेश्मा हरवानी ,पूजा हरवानी, चेतना बुधलानी ,कोमल कुकरेजा, पल्लवी कुकरेजा, रोशनी बुधलानी,अनिता मारवे,रती माताजी, मंदा गायकवाड, कृष्णा शेंडे, फुलकुमारी यादव ,रमा श्रीवास, माया गुप्ता, गिता गुप्ता , कु. राठौड़ माताजी, रंजना शेलोकार ,साक्षी वाघमारे यांनी कृष्ण जन्माष्टमी महोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते.