जुगार खेळणाऱ्या 9 जणांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
12
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

जिल्ह्यात आगामी काळातील सण उत्सव संबंधाने अवैद्य धंद्यावर आळा बसावा करिता ,अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा यांची बारीक लक्ष असून, मंगरूळ दस्तगीर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून खबर मिळाल्यावर दिघे महल्ले शेतशिवारातील बबलू ढाकुलकर कर यांचे शेतात काही इसम 52 तास पत्त्यावर एक्का बादशहा नावाच्या मांग पत्त्यावर पैशाची बाजी लावून हार जीतीचा जुगार खेळ खेळवीत आहे. अशी माहिती मिळाली असता ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी जुगार रेट केली. जुगार खेळणारे नऊ जण जागीच मिळून आले. त्यांचे ताब्यातून नगदी 63 हजार 630 रुपये, 9मोबाईल किंमत अंदाजे 108000 हजार रुपये, तीन मोटरसायकल किंमत अंदाजे 2,30000 रुपये व तास पत्ते असा एकूण 4,01630 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला .नऊ युवकांना पुढील कारवाईसाठी मंगरूळ दस्तगीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी नऊ जनाविरुद्ध कलम 12 अ म.जु.का अननवे गुन्ह्याची नोंद केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, अमरावती ग्रामीण, किरण वानखडे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. मूलचंद भांबूरकर, अमंलदार मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजीया, चा.पो.हवा. संजय प्रधान यांनी केली.

veer nayak

Google Ad