आर्वी फोटोग्राफर असोसिएशन तर्फे जागतिक छायाचित्रकार दिन साजरा

0
89
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

कॅमेऱ्याची उत्कृष्ट सजावट करून दिंडी काढून ढोल पथकांच्या गजरात फोटोग्राफर बंधूंनी छायाचित्रकार दिनाचा घेतला आनंद

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : येथील आर्वी ता. फोटोग्राफर असोसिएशन तर्फे छायाचित्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा.

 छायाचित्रण हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. एका चित्रात हजार शब्दांचा अर्थ सामावलोला असतो, असे म्हटले जाते. छायाचित्रे वेगवान आणि कधीकधी शब्दांपेक्षा अधिक प्रभावीपणे भावना व्यक्त करतात. सध्या तांत्रिक प्रगतीमुळे फोटोग्राफी प्रत्येक ५ पैकी एका व्यक्तीचा छंद बनली आहे. आजची पिढी सोशल मीडियावर छायाचित्रांच्या माध्यमातून व्यक्त होण्यात आणि अनुभव सांगण्यात खूप रस घेत आहे. दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो.

 त्याचप्रमाणे इंदिरा चौक येथे आर्वी ता. फोटोग्राफर असोसिएशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात असोशियन तर्फे उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी डाॅ. खौवसे सर यांच्या उपस्थितीत सर्व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. 

 इंदिरा चौक येथून विधान परिषद आमदार दादारावजी केचे तसेच संदिप आर.गळहाट वर्धा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष, व मुकुंद भाऊ घाटे, तुषार भाऊ देशकर,शुभम देवगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्वीतील ज्येष्ठ महिला छायाचित्रकार श्रीमती वैशालीताई शिरभाते यांच्या शुभ हस्ते कॅमेऱ्याच्या दिंडीची पूजा करून सुरुवात करण्यात आली. तसेच प्रथमच कॅमेऱ्याची दिंडी ही आर्वी शहराच्या मुख्य भागातून ढोल ताशांच्या गजरात काढून सहकार मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

यावेळी या कार्यक्रमाला प्रकाश सहारे, वैभव सवालाखे, रॉकी करतारी, आमोल अहिव, अमर बडगरे, सचिन श्रीराव, जय खोपे, शुभम शिरभाते, महेंद्र शिरामे, शुभम लोखंडे, मंगेश कसारे, ललित पखाले, विलास सुकळकर,  राजू साबळे, बंडू शिरभाते, प्रवीण भूरके, पंकज गोडबोले, रवी गोडबोले, सचिन पाटनी, राजेश राठोड, अंकुश गहुकार, तेजस पाचोडे, निलेश अमृतकर, अभिषेक ढोले, प्रवीण घोडमारे, अंकुश पाटील, विकी काळपांडे, आशिष करडे, तुषार पाचोडे, अमोल फसाटे, यश शिरपूरे, संकेत थुल हे प्रामुख्याने उपस्थित होते.

veer nayak

Google Ad