सावंगपूर नगरीत स्वातंत्र्य दिन निमित्त ध्वजारोहण व बक्षीस वितरण

0
63
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा,सावंगा विठोबा येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. 

प्रथमतः ग्राम पंचायत कार्यालय येथे सरपंच बंडूभाऊ भोजणे यांचे शुभ हस्ते तथा सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी,कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. नंतर गावातून शाळेतील सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ नागरिक सह प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेचे मुख्याध्यापक भोंगाडे सर यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांचे उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सामूहिक गायन करून सांघिक कवायत सादर करण्यात आली. 

गावातील इयत्ता १ ते १२ मधिल सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना श्री विठोबा अध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पुंजाराम नेमाडे यांच्यातर्फे रोख बक्षीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच बंडूभाऊ भोजने,उपसरपंच काशिनाथ मेश्राम,सदस्य संजय मेंढे,सेवा सहकारी संस्थाचे अध्यक्ष विशाल होले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू राठोड,सैनिक जानराव उके,कर्मचारी राहुल सिनकर,फुलसिंग राठोड, विनोद घुरडे,विनोद कुकडकर, प्रविण कुकडकर,लक्ष्मण राठोड, ग्राम पंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक-पालिका यांची उपस्थिती होती.

veer nayak

Google Ad