चांदुर रेल्वे:- तालुक्यातील श्री विठोबा संस्थान, श्री क्षेत्र सावंगा (विठोबा), ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती येथे १५ ऑगस्ट २०२५, शुक्रवार रोजी गोकुळाष्टमी निमित्त विविध भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावण मास मांड अंतर्गत अखंड रात्रंदिन भजन सुरू राहणार असून दुपारी ४ वाजता गोकुळाष्टमी विशेष – चंदनउटी उत्सव होईल. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता महाप्रसाद वितरण करण्यात येईल.
रात्री ८ वाजता मुख्य मंदिरातून लहान मंदिरात पान, काकडी, मकई-कणीस, नारळ, फुलोरा, लाया-फुटाणे, कापूर ज्योत आदींसह आरतीच्या गजराने “जन्माष्टमी विशेष सोहळा” पार पडेल. मध्यरात्री १२ वाजता कापूर ज्योत आणि आरतीसह जन्मोत्सव साजरा होईल.
तसेच १६ ऑगस्ट २०२५, शनिवार रोजी रात्री ८ वाजता कापूर ज्योतसह आरती आणि गोकुळाष्टमी निमित्त गोपाळकाला प्रसाद वितरण होईल.
सर्व भाविक भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या अध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, तसेच सर्व विश्वस्त मंडळ – विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रवीण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी यांनी केले आहे.