नेत्याचा हट्ट जिंकला मात्र, नागरिकांचे जिवन येणार धोक्यात

0
81
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

नेत्याचा हट्ट जिंकला मात्र, नागरिकांचे जिवन येणार धोक्यात कडक पोलीस बंदोबस्तात व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महामार्गाचे काम झाले सुरू एका फुटाचा व्दिभाजक व पाच मिटरचाच होणार रस्ता, नाली व गट्टुची बोंबाबोंब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : गत दिड महिण्यापासुन दिड मिटरच्या व्दिभाजकाच्या मागणी करीता अडकलेल्या महामार्गाचे काम पोलीसांच्या कडक बंदोबस्तात व राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अखेर सुरू झाले आहे. एका फुटाचा व्दिभाजक आणी अवध्या पाच मिटरचाच रस्ता होणार असल्याने नाली व गट्टुला तिलाजंली देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे नेत्याचा हट्ट जिंकला असला तरी नागरिकांचे जिवन मात्र धोक्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

रस्त्याच्या मध्यभागातुन जाणाऱ्या आर्वी-तळेगाव (शा.पं.) या महामार्गाचे अवघ्या दिड किलोमिटरचे बांधकाम राहिलेले आहे. यातील पुलगाव मार्गावरील रेल्वे स्टेशन पासुन तर, डाक घर कार्यालया पर्यंतचा रस्ता योग्य पध्दतीने बनवीला आहे. यात शहराच्या सौंदर्यीकरणात वाढ होणारच आहे. मात्र पुढे शिवाजी चौका पासुन तर पिवळ्या गोट्या पर्यंतच्या रस्त्याचे विद्रुपीकरण नक्कीच होणार आहे. प्रथम तर हा मार्ग माध्यमापासुन दोन फुट डावीकडे सरकवीला आहे. या शिवाय व्दिभाजक सुध्दा एक फुटाचाच घेण्यात आला आहे. तर, दुसरीकडे रस्त्याचे बांधकाम सुध्दा पाचच मिटरचे होणार असल्याची माहिती मिळाली असुन नाली व गट्टूची बोंबाबोब राहणार असल्याचे कळते.

शिवाजी चौका पासुन तर नवीन बनलेल्या न्यायालयाच्या इमारती पर्यंत २४ मिटरचा रस्ता बनायला पाहिजे होता. मात्र याला सुध्दा कात्री लावण्यात आली आणी पिवळ्या गोट्या पर्यंतच्या रस्त्याची सुध्दा रुंदी कमी झाली. अशातच दिड मिटरचा व्दिभाजक व्हायला पाहिजे होता मात्र तो सुध्दा एका फुटा पर्यंत कमी केला. सर्व्हीस मार्ग नसल्याने या एकाच मार्गाचा उपयोग नागरिकांना करावा लागणार आहे. यात सुध्दा एका फुटाचाच व्दिभाजक असल्यामुळे रस्ता जिव मुठीत घेवुन ओलांडावा लागणार आहे. व्दिभाजक दिड मिटरचा असता तर, पायदळ नागरीकांना, शालेय विध्यार्थ्यांना, वाहनाना सुरक्षीत थांबण्याकरीता जागा झाली असती. मात्र याचा विचार राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने तर केलाच नाही शिवाय नेत्यांचा आपला ईगो सुध्दा आडवा आला. एकाने चार फुटाची मागणी केली तर, दुसऱ्याने दिड फुटाचाच व्दिभाजक होणार असा हट्ट धरला आणी अखेर वरिष्ठ नेत्यांनी नागरिकांच्या जिवनाचा विचार न करता लाडक्या नेत्याचा हट्ट पुर्ण केला. भविष्यात यामुळे अपघात झाले आणी जिवीत हानी झाली तर याकरीता कोणाला जबाबदार धराव असा प्रश्न नागरिकांपुढे उपस्थीत झाला आहे.

अशी झाली महामार्गाची रुंदी कमी

          सन २०२२ पासुन तळेगाव (शा.पं.) महामार्गावरील झाडांचा प्रश्न एैरणीवर आला होता. त्यावेळी बुलढाणा अर्बन बॅकेंच्या गोदाम पासुन पुलगाव मार्गावरील रल्वे क्रासींग पर्यंत चार किलोमिटरचा रस्ता चार पदरी करण्याचे ठरले होते. त्यावेळी साधारण ३०० झाडाची तोडाई करावी लागणार होती. मात्र झाडांचे कारण पुढे करुन त्याची रुंदी कमी केली. आणी पिवळ्या गोट्या पासुन अवघा दिड किलोमिटरचा चार पदरीरस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. यात सुध्दा ७८ झाडे तोडावी लागणार होती याची परवानगी सुध्दा घेतली. वन विभागाला १६ लाख रुपये तर नगर परिषदेला दोन लाख ५० हजार रुपये भरले. अशातच पर्यावरण बचाव समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात जनहित याचीका दाखल करुन झाड तोडाईला स्थगना आदेश प्राप्त केला. न्यायालयाने सुध्दा राष्टीय महामार्ग विभागाचा मागील अनुभव पाहता आधी झाडे लावा आणी नंतरच झाडे तोडा असे निर्देश दिले. महामार्ग विभागाने झाडे लावण्याचा विचार सोडुन दिला आणी रस्ताची रुंदीच कमी करण्याचा सरळ सोपा मार्ग निवडला परिणामी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. आज एका फुटाचा व्दिभाजक झाल्याबरोबर थैइथैइ नाचणाऱ्या नेत्याच्या चेल्या चपाट्यानी व नेत्याने सुध्दा याकडे दुर्लक्ष केले. कशामुळे? अस काय घडल होत? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

असं दिड मिटरच व्दिभाजक झालं असतं तर ? स्वरंक्षण करत उभे असलेले विध्यार्थी व वाहन असाच हट्ट केला असता तर झाडामुळे रस्त्याची रुंदी कमी करण्यात आली अशी बोंबाबोंब ठोकल्या जात आहे. मात्र २०२४ मध्ये जेव्हा जनहित याचीका दाखल झाली त्याच वेळेस जनेतेकडून वकील उभा केला असता तर केव्हाचाच झाडाचा प्रश्न निकाली निघाला असता. झाड वाचवीण्याच्या नादात तुकड्यातुकड्यात निकृष्ट दर्जाचा झालेला रस्ता सलग आणी मजबुत झाला असता. किंबहुना त्याच वेळी नेत्यांनी झाडे लावण्याकरीता हट्ट धरला असता तर आज नागरिकांना मजबुत व चांगल्या दर्जाचा, सुरक्षीत रस्ता मिळाला असता असे बोलल्या जात आहे.

veer nayak

Google Ad