अंजनसिंगीतील शासकीय कामे ताबडतोब करण्यासाठी सा.बा.वी धामणगावंना यानां भाकपा चे निवेदन

0
21
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अंजनसिंगी लोकमत न्यूज नेटवर्क अंजनसिंगी गावात शासकीय कामे विविध फंडातून मंजूर झाली असून ती कामे सार्वजनिक बांधकाम विभाग धामणगाव रेल्वे यांच्या अधिकाराखाली येत असल्यामुळे ती कामे ताबडतोब करण्यासाठी आणि केलेल्या कामाचे दर्जा योग्य नसल्यामुळेत्याची चौकशी करण्याविषयी भारतीय कम्युनिस्ट पक्ष धामणगाव रेल्वे तालुका कौन्सिल ने निवेदन दिले आहे. नुकतेच येथील वार्ड नंबर चार मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास उपाययोजना 2022 या अंतर्गत नालीचे बांधकाम ठेकेदारा मार्फत करण्यात आले परंतु बांधकाम झाल्यानंतर एक महिन्याआत नाली वर टाकलेला स्लॅप ला मध्यभागी छिद्र पडले त्यामुळे त्या कामाची चौकशी करण्यात यावी तसेच मातोश्री पांदन रस्ता निंबोली ते अंजनसिंगी या पांदण रस्त्याचे काम हे इस्टिमेट प्रमाणे करण्यात यावे, या गावातील रिद्धपूर ते यवतमाळ रोडवरील कामामुळे जे पूर्वीचे बस स्थानक सार्वजनिक बांधकाम विभागाने तोडले त्याच ठिकाणी नव्याने बस स्थानक करून द्यावे अशा विविध मागण्या घेऊन भारतीय कॅम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव श्रीकृष्ण सडमाके, जिल्हा कौन्सिलर कैलास ठाकरे, अशोक काळे, आदित्य बाणासुरे त्यांनी नरेंद्र वानखडे उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धामणगाव रेल्वे यांना दिले

veer nayak

Google Ad