महर्षि शाळेत राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत गप्पी मासे जनजागृती अभियान संपन्न

0
21
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती महानगरपालिका संचालित महिंद्र कॉलनी व अंकुर होलीनेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महर्षी पब्लिक स्कूल नवसारी येथे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण व गप्पी मासे माहिती अभियान सह झाडे वाटप कार्यक्रम उत्साहित पार पाडला.

यावेळी प्रमुख मान्यवर सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल काळे, साथ रोग अधिकारी डॉ. रुपेश खडसे ,शहरी आरोग्य निरीक्षक हैदर अली ,शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी डॉ.मनोज मुंदडा व अंकुर हॉलनेस फाउंडेशन संस्थापक महाराष्ट्र पोलीस श्री निलेश गाडे तसेच महर्षी पब्लिक स्कूल प्रिन्सिपल अबिन सी राज व डॉ.तौसिब अन्सारी होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून संत गाडगेबाबा च्या फोटोला हार अर्पण करून केली.

सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरी आरोग्य निरीक्षक हैदर अली यांनी डेंगू चे घातक परिणाम व डेंगू कशामुळे उत्पन्न होतो याचे प्रमुख लक्षण काय यावर उपाययोजना काय हे मोजक्या शब्दात व स्पष्टपणे समजावून सांगितले व कीटकजन्य व जलजन्य आजाराविषयी जागरूकता व्हावी यावर भर दिला तसेच गप्पी मासे महत्त्व काय हे मुलांना समजावून सांगितले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले तसेच साथ रोग अधिकारी महानगरपालिका डॉ.रुपेश खडसे यांनी सर्वांना स्वच्छता विषयी महत्व पटवून दिले, गप्पी मासे , पाण्यापासून व कीटकांपासून होणाऱ्या आजारकरीता कोणत्या उपाययोजना कराव्यात ह्या साठी शालेय विद्यार्थी यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक दिवस कोरडा पाळावा, मच्छर दाणी व्हा वापर करावा ,उघड्यावरचे अन्न खाऊ नये ,जेवणाअगोदर हात स्वच्छ धुवावे असे मार्गदर्शन केले त्यानंतर अंकुर होलीनेस फाउंडेशनचे संस्थापक महाराष्ट्र पोलीस निलेश गाडे यांनी लहानपणापासूनच मुलांना स्वच्छता समजावून सांगणे हे महत्त्वाचे आहे यावर भर दिला त्यानंतर मनोज मुंदडा वैद्यकीय अधिकारी यांनी थोडक्यात पण महत्त्वाचे स्वच्छतेविषयी सांगितले यानंतर झाडे वाटप करण्यात आले व लगेचच स्वच्छतेविषयी सहा नियम आशा वर्कर संध्या पाटील यांनी प्रॅक्टिकली करून दाखविले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा वर्कर संध्या पाटील यांनी उत्स्फूर्तपणे पार पाडले यावेळी उपस्थित असलेले आरोग्य सेवक मनीष हटवार, आरोग्य सेवक उमेश जाधव आरोग्य सेविका वैशाली सुरवसे, आरोग्य सेविका अर्चना बाळस्कर, आरोग्य सेविका सीमा तेलंग ,आरोग्य सेविका बबीता ताई तायडे ,अंजू कासदेकर , राधिका झाडे, वैद्यकीय सहाय्यक अधिकारी पीटर,डॉ.भारती डोंगरे राहुल खलेलकर ,आतिश यादव, मीनाक्षी पाटेकर सर्व आशा वर्कर शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महर्षी पब्लिक स्कूल शिक्षिका प्राची मिश्रा यांनी पार पाडले

veer nayak

Google Ad