धामणगावात आज श्री रामदेव बाबा अमृत कथा निमित्त भव्य ध्वज व शोभा यात्रेचे आयोजन….

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगावात रेल्वे येथे राजस्थान येथील रामदेवरा ऋणीच्याचे रामदेव बाबा यांच्या जीवनावरील अमृत कथा महोत्सवाचे आयोजन आज शुक्रवार दिनांक २५ ते २७ जुलै या तीन दिवसांत करण्यात आलेले असून या निमित्य आज सकाळी नऊ वाजता श्री रामदेव बाबा मंदिर, अमर शहीद भगतसिंग चौक, येथून भव्य ध्वज यात्रेचे व शोभायात्रा चे आयोजन करण्यात आलेले आहे 

कथा वाचन कोलकाता येथील रामदेव बाबा जीवनावरील कथावाचक संत जयप्रकाश महाराज यांच्या वाणीतून होणार आहे. दररोज दुपारी २ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आरोही रिसोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे कथेमध्ये पहिल्या दिवशी रामदेव बाबांचा जन्मोत्सव, दुसऱ्या दिवशी बाबांचा लीला उत्सव तसेच रविवार २७ जुलैला बाबांचा ब्यावला उत्सव होणार आहे.

धामणगाव पहिल्यांदाच होणाऱ्या या श्री रामदेव बाबांच्या भव्य कथा आयोजनामध्ये कथा श्रवण करण्याची विनंती श्री परशुराम महिला सेवा समिती व श्री परशुराम सेवा समिती यांनी केलेली आहे

veer nayak

Google Ad