धामणगाव रेल्वे शहरात दिनांक 21जुलै या दिवशी सार्वत्रिक एकदिवसीय गप्पी मासे सोड मोहीम 2025 ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे मा.कांचन रहांगडाले (वैद्यकीय अधीक्षक, धामणगाव रेल्वे )मा.श्री.डॉ. शरदजी जोगी (जिल्हा हत्तीरोग अधिकारी,अमरावती) मा.श्री.डॉ.जुनेदजी फैझल (जिल्हा हत्तीरोग अधिकारी, अमरावती)यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली.
शहरातील हंगामी व कायमस्वरूपी डात्सोत्पत्ती ठिकाणात गप्पी मासे सोडण्यात आले.प्रभागातील रहिवासी लोकांना गप्पी मासे व कीटकजन्य आजारा बद्दल सखोल माहिती देण्यात आली.
1) डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग, चिकुनगुनिया व इतर कीटकजन्य आजार कसा होतो?
2) त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे?
3) आजार होऊ नयेत याबद्दल नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
4) कोरडा दिवस कसा पाळायचा? कोरड्या दिवसाचे महत्व सांगण्यात आले.
4) गप्पी मासे सोल्यामुळं त्याचे काय चांगले परिणाम होतात? याची सर्व माहिती देण्यात आली.
यावेळी हत्तीरोग उपपथक धामणगाव रेल्वे येथील श्री. मंगेशजी मोने आरोग्य निरीक्षक, श्री. घनशामजी भोयर आरोग्य उपनिरीक्षक ,श्री. पंकज खांडरे आरोग्य उपनिरीक्षक , श्री. रवींद्र सोनुले क्षेत्र कर्मचारी, श्री. प्रशिक बेताल क्षेत्र कर्मचारी,श्री.चेतन भारती क्षेत्र कर्मचारी उपस्थित होते.