नाहीतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन करण्यात येईल…
शहर संघटक डॉ.अशोक कुचेरिया यांच्या इशारा !
४ जुलाई रोजी धामणगाव शहरातील समस्या बाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने धामणगाव नगर परिषद चे सीईओ यांना निवेदन देण्यात आले होते आणि त्यामध्ये मागणी मागणी करण्यात आली होती की शास्त्री चौक ते से.फ.ला.हायस्कूल पर्यंत रस्त्याचे दयनीय अवस्था झाली आहे.
या रस्त्याचे काम 15 दिवसाचे आत करण्यात यावा अशा दिलेले निवेदनातून मागणी करण्यात आली होती , या निवेदनाची दखल घेत नगर परिषद यांनी खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे त्याचे आम्ही आभारी आहोत परंतु उरलेले खड्डे लवकरात लवकरच बुझवण्यात यावा नाही तर उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर संघटक डॉ.अशोक कुचेरिया यांनी विदर्भ टुडे न्यूजशी बोलताना दिला आहे…