अमरावती – शहरी आरोग्य केंद्र पठाणचौक येथील डॉ.निगार खान स्त्री वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महानगरपालिका उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जमील कॉलनी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने कीटकजन्य व जलजन्य आजाराविषयी जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य अब्दुल सईद यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा अमरावती, तसेच डॉ. रुपेश खडसे साथरोग अधिकारी मनपा अमरावती, डॉ. अश्विनी भिलावेकर, वैद्यकीय अधिकारी मौलाना आझाद यांचे स्वागत श्री अब्दुल सईद, प्राचार्य यांनी फुल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. अब्दुल सईद प्राचार्य यांनी कीटकजन्य व जलजन्य आजारांविषयी हा कार्यक्रम शाळेत घेण्याविषयी चे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी सतत पडत असलेल्या पावसाबद्दल माहिती देऊन या पावसाळ्यात कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो याबद्दल आपण उपाययोजना कशा कराव्यात याविषयी विस्तृतपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच झालेल्या कार्यक्रमाचा सांगता सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत करावा जेणेकरून कीटकजन्य आजारांना आळा घालता येईल व उपाययोजना करता येईल. डॉ. विशाल काळे यांनी आवर्जून सांगितले की फ्रीजच्या मागे असलेले ट्रे, फुलदाण्या, नारळाच्या करवंट्या, पाण्याचे हौद, रांजण व साचलेले पाणी यांना खाली करून आठवड्यातून एक दिवस कोरडा ठेवावा जेणेकरून डासांचे उत्पत्ति स्थान नष्ट होईल. तसेच आरोग्य कर्मचारी व आशाताई यांना कीटकजन्य आजारांविषयी मदत करावी. डॉ.रुपेश खडसे साथरोग अधिकारी यांनी कीटकजन्य आजाराविषयी योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये एक अनोखा जोश निर्माण केला त्यांनी जशी बंदीकुतून एक गोळी निघाली आणि ते जर व्यक्तीला लागली तर एक व्यक्ती मरण पावतो परंतु एक डास कित्येक नागरिकांचे जीवन धोक्यात टाकू शकतो याची कल्पनाही आपण करू शकत नाही त्यामुळे आपण आपला परिसर व विद्यालय स्वच्छ ठेवावा जेणेकरून डेंगू मलेरिया चिकनगुनिया व इतर कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव आपल्याला व आपल्या कुटुंबातील व्यक्तींना होणार नाही याविषयीची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांचे व प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन उत्स्फूर्तपणे ऐकून घेतले. श्री दिपंकर बरडे आरोग्य सेवक यांनी सूत्रसंचालन दरम्यान काही मराठी शायरी म्हणत डेंगू मलेरिया चिकनगुनिया या आजारांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा एक छोटासा प्रयत्न केल ओळख ही आहे डेंगूची, मच्छरांच्या प्रेमाची,
एक चावा घेतला की वाट लागते जीवाची!
पाणी साठवू नका घराभोवती,
डेंगू दूर ठेवू आपण एकत्र येती!
️पावसात आला पाहुणा नवा,मलेरिया नावाचा जीवाला हवा!
नेट्स लावा, औषध फवारणी करा,
स्वच्छता ठेवा, रोग दूर करा!
स्वच्छतेत आहे शक्ती,
डेंगू-मलेरिया नाही येणार भक्ती!
थेंब थेंब पाण्यात मच्छर वाढतो,
जागरूक नागरिकच त्याला आळा घालतो! याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये शेरोशायरी अंदाज मध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसेच डेंगू मलेरिया विषयी विद्यार्थ्यांना शपथ दिली. या कार्यक्रमाप्रसंगी शहरी आरोग्य केंद्र पठाण चौक येथील सर्व आरोग्य कर्मचारी व आशा उपस्थित होते. तसेच शाळेचे प्राचार्य अब्दुल सहित, सहाय्यक शिक्षिका समीना सुलताना, शाबाहक सिद्धकी, हाफिज खान,अर्शिया कौसर, अब्दुल सिद्दिकी,अशिया फरहीन, दुुरेश्वर, आतिफ अन्वर, उमरखान, यशरा सानिया, अंशकालीन निदेश, तकशीन आणि लिपिक ललित शेवटकर या सर्व माननीय शिक्षक वृंद व शिक्षिका यांनी कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.