पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आई वडिलांवर वर अवलंबून असतो. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो.पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच, पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते…
दिनांक – 10 जुलै – गुरू पौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो…आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते..याच दिवसाला व्यास पौर्णिमा असेही संबोधिले जाते..से.फ.ला.हायस्कूल,धामणगाव- रेल्वे जिल्हा -अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विदयालयाच्या दर्शनी फालकावर गुरु पौर्णिमा निमित्त चित्र रेखाटन करून सर्व गुरुवर्यांना शुभेच्छा दिल्या आहे..