आमला विश्वेश्वर, तालुका चांदूर रेल्वे येथील महिला शेतकरी कविता डोंगरे यांना सन 2025 चा कृषी विभाग जिल्हा परिषद अमरावती चा अत्यंत मानाचा कै.वसंतराव नाईकी ाकृषी गौरव पुरस्काराने सन्मान..

0
25
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या 1जुलै 2025 जयंतीदिनी कृषी विभाग जिल्हा परिषद अमरावती च्या वतीने 14 उत्कृष्ट महिला शेतकरी म्हणून वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार साठी निवड करण्यात आली.

महिला शेतकरी कविताताई डोंगरे यांना एक जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद सभागृह अमरावती येथे मुख्य कार्यपालन अधिकारीअमरावती संजीता मोहपात्रा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सहायक संचालक कृषी अमरावती विभाग, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अमरावती, डी आर डी ए प्रीती देशमुख मॅडम, प्रकल्प संचालक आत्मा अर्चना निस्ताने आधी मान्यवर अधिकारी वर्ग यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

veer nayak

Google Ad