अमरावती – सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र, दस्तुर नगर येथे जागतिक डेंगू दिवसानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त महानगरपालिका अमरावती, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा अमरावती, डॉ. शरद जोगी, जिल्हा हिवताप अधिकारी अमरावती, डॉ. रुपेश खडसे, साथरोग अधिकारी मनपा अमरावती तसेच मा. डॉ. संदीप पाठबागे, नोडल अधिकारी मनपा अमरावती तसेच सर्व शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. शरद जोगी, जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ. रुपेश खडसे, साथरोग अधिकारी यांनी जागतिक डेंगू दिनानिमित्त डेंगू आजाराबद्दल मार्गदर्शन केले. सन 2024 – 2025 या वर्षांमध्ये “राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम”अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त मनपा अमरावती यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त मनपा अमरावती अध्यक्ष भाषणात जागतिक डेंगूदिनानिमित्त कर्मचाऱ्यांना डेंगू आजाराबद्दल नियोजनबद्ध काम करून प्रतिबंधात्मक उपाय योजना व सुरक्षितता बाबत उपाययोजना कशा कराव्या याविषयी मार्गदर्शन केले.
डॉ.विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी सुद्धा मान्सून पूर्व उपाय योजना करून घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांना सूचना दिल्या. अधिकारी, डॉ शरद जोगी जिल्हा हिवताप अधिकारी यांनी भाषणात सांगितले की डेंग्यू दिवस हा निरंतर सुरू राहणार आहे व तपासा.स्वच्छ ठेवा , झाकून ठेवा व डेंग्यू हरवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करा ह्या नाऱ्हा नुसार काम करा . डॉ रुपेश खडसे साथरोग अधिकारी यांनी सुद्धा एक दिवस कोरडा पाळा, घरातील फुलदाणी , कंटेनर स्वच्छ कोरडे करा असे सांगितले . जनजागृती प्रभातफेरीला हिरवी झेंडी दाखवून डॉ मेघना वासनकर व डॉ विशाल काळे यांनी सुरुवात केली. या कार्यक्रमात डॉ संदीप पाटबागे डॉ.अश्विनी खडसे , डॉ वैशाली काकडे , डॉ मानसी मुरके , डॉ सचिन भलावी , डॉ विक्रांत राजूरकर , डॉ सचिन सोनोने, डॉ मनोज मुंदडा, डॉ. निगार खान व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व आरोग्य कर्मचारी, आशा यांनी मोलाची साथ दिली. कार्यक्रमाचे आयोजन श्री हैदर अली आरोग्य निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिपंकर बरडे व आभार प्रदर्शन श्री बबन खंडारे यांनी केले.