अमरावती : गौण खनिजाची अवैध
वाहतूक रोखण्यासाठी पथकांना २४ बाय ७ पथके सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी शुक्रवारी महसूल यंत्रणेसह प्रादेशिक परिवहन विभागाला दिले.
‘बुधवारी ‘अमरावतीत पहाटे दाखल होतात चक्क नंबर प्लेटवर खोडतोड असलेले ट्रक’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओ, वाहतूक विभाग व महसूल यंत्रणेची संयुक्त बैठक घेतली. बैठकीला एआरटीओ सिद्धार्थ ढोके, प्रभारी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, डीसीपी सागर पाटील, तसेच वाहतूक शाखेचे एसीपी संजय खताळे, खनिकर्म अधिकारी इब्राहिम शेख हे उपस्थित होते. जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध घालण्याकरिता भरारी पथके कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. वाहतूक पोलिसांचेही कान टोचले.
टोल नाक्यावर नंबरप्लेट स्कॅन होत नाही का?
भल्या पहाटे गौण खनिज तस्करीची वाहने नांदगाव पेठ टोल नाका ओलांडून अमरावतीत येत असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र ट्रकचे नंबर प्लेटवर खोडतोड असताना ते टोल नाक्यावर स्कॅन होत नाही का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. किंबहुना टोल नाका देखील या गौण खनिज तस्करांनी मॅनेज तर केला नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. हा सर्व संशयास्पद प्रकार आहे.
नंबर प्लेटची खोडतोड, कुणालाही नाही सोयरसुतक
जिल्ह्यात अनेक ठिकाणी रेती घाटाचे लिलाव झाले नाहीत. तरीसुद्धा अनेक घाटांवरून विनारॉयल्टी रेती चोरीच्या घटना होत असल्याचे वास्तव काही घटनांवरून समोर आले आहे. किंबहुना शहरात पहाटेपासून अनेक ट्रकद्वारे रेतीची वाहतूक केली जाते. मात्र, या ट्रकची ओळख किंवा क्रमांक संबंधित विभागाने नोंद करू नये, म्हणून या ट्रक चालकांनी नंबर प्लेटवर खोडतोड करून
‘ अवैध रेती तस्करी व वाहतुकीवर टाकलेला प्रकाशझोत. चेक पोस्टवर तपासणीच नाही
जिल्ह्यात सद्यःस्थितीत एकही रेतीघाट लिलाव न झाल्याने वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक होत आहे. मध्य प्रदेशातून अवैधरित्या वाळू, गिट्टी, मुरुम जिल्ह्यात येत आहे, मात्र या वाहनांची चेक पोस्टवर तपासणी होत नसल्याने या ठिकाणी आता २४ तास तपासणीकरिता अधिकारी, कर्मचारी असणे गरजेचे आहे.
हे ट्रक बिनधास्त वाहतूक करतात. अनेक चालकांनी मागील बाजूस नंबर प्लेटच लावल्या नाहीत. ज्यांनी लावल्या आहेत, त्यांनी मात्र त्यावर काळी शाई लावली आहे. गौण खनिज वाहतूक करणारे हे ट्रक नांदगाव पेठ टोल नाक्यावरून शहरात दाखल होतात. मात्र, या ट्रकच्या समोर बाजूस लावण्यात आलेली नंबर प्लेटवर खोडतोड असूनसुद्धा ते टोल नाक्यावरून सहज प्रवेश करतात.
अवैध गौणखनिज, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीकरिता परिवहन विभागासह महसूल व पोलिस विभागाशी समन्वय साधून चेकपोस्ट स्थापन करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. तसेच चेकपोस्ट स्थापन करण्याकरिता जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल.
सौरभ कटियार, जिल्हाधिकारी.