धामणगांव रेल्वे,
श्री संत बगाजी महाराज समाधी सोहळा श्री क्षेत्र वरुड (बगाजी) ता. धामणगांव (रेल्वे) येथे बुधवार दि. ३० एप्रिल ते मंगळवार दि. ६ मे २०२५ पर्यंत संगीतमय भागवत कथा व अखंड हरीनाम सप्ताह आयोजित करण्यात आलेले असून श्रीमद भागवत कथा प्रवक्त्या म्हणून ह.भ.प. वैष्णवीताई खडतकर (आळंदीकर) आपल्या सुमधुरवाणीतून भागवत कथेचे श्रवण करणार आहेत
” वरुडा जयांचे असे वासस्थान । वशिष्ठा तिरी रम्य जयाचे मकान । सदा सर्वदा रक्षिजे भाविकाला। नमस्कार माझा बगाजी पदाला”
दरवर्षी प्रमाणे या वर्षी श्री संत बगाजी महाराज समाधी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या निमित्य तीर्थ स्थापना व किर्तन सेवा बुधवारी झालेली असून आज दिनांक एक मे पासून तर सहा मे पर्यंत दररोज किर्तन सेवा होणार आहेत या कीर्तन सेवा करिता ह.भ.प. श्री राहुल महाराज हजारे (वाढोणा) ता. आर्वी जि.वर्धा ह.भ.प. गौरव महाराज ठाकरे, वर्धा
ह.भ.प. आदित्य महाराज चौधरी (आळंदीकर), मंगरुळपीर, जि. वाशिम अनंत महाराज पुयड (नाखेगाव) ता. दारव्हा जि. यवतमाळ
ह.भ.प. श्री. धिरज महाराज तिजारे, वरुड बगाजीकर कु. शिवानीताई घोंगले (पिंपळखुटा) जि. यवतमाळ मंगळवार दि. ०६/०५/२०२५ सकाळी ११ ते १ काल्याचे किर्तन भास्कर महाराज पिंपळे (तात्या महाराज) कुऱ्हा यांच्या मधुर वाणीतून होणार आहे भागवत कथेला साथसंगत ह.भ.प. समीर महाराज कुबडे (ऑर्गन व गायन) संकेत महाराज बागमारे (तबला) ह.भ.प. रोशन महाराज चांदुरकर (पॅड)
मृदंगाचार् वेदांत महाराज येंडे (आळंदीकर) टाळकरी संच प्रामुख्याने सेवा देणार आहेत
दुपारी २ ते ५ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे
सायंकाळी ६ वाजता श्रींची भव्य नगर प्रदक्षिणा होईल रात्री ८ वाजता बाल समाज प्रबोधनकार सप्त खंजेरी वादन आराध्य महाराज कोरडे (यवतमाळ) यांचे होणार आहे तसेच याप्रसंगी विनोदी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल तालुक्यातील समस्त भक्तांनी भागवत कथेचा व दैनंदिन आध्यात्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याची विनंती राजु दगडकर, विपिन दगडकर व समस्त गावकरी मंडळी व ह.भ.प. श्री. धिरज महाराज तिजारे, वरुड (बगाजी) ह.भ.प. श्री. गणेश महाराज नघाट वरुड (बगाजी) व समस्त गावकरी मंडळी, वरुड (बगाजी)यांनी केले आहे