” जागतिक हिवताप दिन ” 25 एप्रिल या वर्षाचे घोषवाक्य
_” : , , “_
_“ चला हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा “_
या घोषवाक्याला अनुसरून ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे,तालुका धामणगाव रेल्वे येथे जागतिक हिवताप दिन मा. जिल्हा हिवताप अधिकारी मा.श्री. शरद जोगी,मा. श्री. हत्तीरोग अधिकारी दिनेश भगत, मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हर्षल क्षीरसागर व मा.वैद्यकीय अधिक्षक कांचन रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात
श्री. स्वामी समर्थ फार्मसी महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथे हत्तीरोग नियंत्रण उप-पथक धामणगाव रेल्वे यांच्या अंतर्गत जागतिक हिवताप दिवस साजरा करण्यात आला.
हिवताप व अन्य किटकजन्य आजार थांबवण्याकरीता शासकीय आरोग्य यंत्रणे सोबतच जनतेच्या सहयोगातून नियंत्रण करता येईल. असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
कार्यक्रमात श्री. पोटे सर (प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ), श्री. मंगेश मोने (आरोग्य पर्यवेक्षक), श्री. घनशाम भोयर (आरोग्य उपनिरीक्षक ), श्री.पंकज खांडरे (आरोग्य उपनिक्षक) यांनी हिवताप विषयावर सखोल मार्गदर्शन केले.श्री.खुशाल गावंडे (क्षेत्र कर्मचारी ),श्री. चेतन भारती (क्षेत्र कर्मचारी ),श्री. रवी सोनुले(क्षेत्र कर्मचारी ),श्री. प्रशिक बेताल (क्षेत्र कर्मचारी ), कर्मचारी यांनी सदर कार्यक्रम प्रसंगी परिश्रम घेतले.