अमरावती । अमरावतीच्या महादेव खोरी परिसरातील बागडे ले-आऊट मधील गेले दहा वर्षापासून रस्ते सांडपाण्याच्या नाल्या, विद्युत खांब, लाईट्स, खुल्या भूखंडाला तार कंपाऊंड आदी नागरी सुविधेच्या प्रतिक्षेत आहे यासाठी नागरिकांनी खासदार मनपा आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना ले आऊट मधील समस्या बाबत निवेदन देण्यात आले ले आऊट मधील लवकरात लवकर आम्हाला सोय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी बागडे लेआउट सुधार समितीने खासदार बळवंत वानखडे यांच्यासह मनपा आयुक्त यांना निवेदनातून केली आहे. मनपा क्षेत्रातील महादेवखोरी परिसरातील बागडे ले-आऊट येथे १९८२ पासून नागरिक वास्तव्यास आहे.
या ले-आऊटला ४३ वर्षे होत आहेत. २० वर्षापासून नागरिकांनी आपल्या जागेवर मनपाची बांधकाम परवानगी घेऊन घरे बांधून रहायला आले. मात्र, आजवर बागडे ले-आऊटमध्ये अत्यावश्यक गरजांपैकी बागडे ले-आऊटमधील रस्ते (रोड) डांबरीकरण, सिमेंट कॉक्रिटीकरणाने बांधून देणे, बागडे ले-आऊट मधील रोड लगतच्या नाल्या व घरामागील सांडपाण्याच्या नाल्या अंडर ग्राऊंड बांधून देणे. बागडे ले-आऊट मधील प्रत्येक विद्युत खांबावर दोन पथदिवे लावणे. महादेव खोरी टेकडी वरून वाहणाऱ्या नाल्यावरील मोठ्या पुलांचे बांधकाम पूर्ण करणे. स्वतंत्र विद्युत डीपी, कमलसूख विहार वसाहतपासून ते महादेवखोरी टेकडी शंकर मंदीरापर्यंतचा मुख्य रस्ता डांबरीकरण, सिमेंट कॉक्रिटीकरासह रुंदीकर करुन द्यावा खुल्या भुखंडाच्या सभोवताल तार कंपाऊंड करणे, व्यायामाचे साहित्य, वयोवृध्दांसाठी बसण्याची व्यवस्था तसेच वॉकिंग ट्रॅक, वृक्ष लागवड, लाईट्सची व्यवस्था, यासारख्या नागरी सुविधा द्याव्या अशी मागणी सुधार समितीने निवेदनातून केली. या वेळी विठ्ठल मरापे, सुंदरलाल उईके, अमोल वानखडे, सागर डोंगरे, सतिश कुकडे, संतोष गायकवाड, नवीन मेश्राम, सुरेंद्र डोंगरे, सुमेध इंगळे, जितेंद्र माटे, भिमराव खडसे, प्रदीप गायकवाड, ज्ञानेश्वर रंगारी, अॅड. सी.बी. वसूकर, आकाश राऊत, नंदकिशोर बोरकर आदी उपस्थित होते.