श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह व श्री गुरुचरित्र महापारायण

0
11
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

शनिवार, दि. १९ एप्रिल २०२५ ते शनिवार २६ एप्रिल २०२५ पर्यंत येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह व श्री गुरुचरित्र महापारायण चे आयोजन करण्यात आलेले आहे
शनिवार, १९ एप्रिल २०२५ ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी करण्यात आली रविवार, २० एप्रील २०२५ मंडल स्थापना, अग्निस्थापना,स्थापित देवता हवन सोमवार २१ एप्रील २०२५ नित्य स्वाहाकार, गणेश याग, मनोबोध याग तसेच मंगळवार, दि. २२ एप्रिल २०२५ नित्य स्वाहाकार, श्री चंडीयाग बुधवार, दि. २३ एप्रिल २०२५ नित्यस्वाहाकार, श्री. स्वामी याग गुरुवार २४ एप्रिल २०२५ नित्य स्वाहाकार, श्री गीताई या शुक्रवार २५ एप्रिल २०२५ नित्य स्वाहाकार, मल्हारी याग, रुद्रयाग व शनिवार दि.२६ एप्रिल २०२५ नित्य स्वाहाकार, बली पुर्णहूती आयोजित करण्यात आलेली

असून दैनंदिन कार्यक्रमांतर्गत सकाळी ८.०० ते ८.३० भूपाळी आरती सकाळी ८.३० ते १०.३० सामुहिक गुरुचरित्र वाचन सकाळी १०:३० नैवद्य आरती मंत्र पुष्पांजलीसह सकाळी १०.३० ते १२.०० विशेष याग दुपारी १२.३० ते २.०० श्री दुर्गासप्तशती व श्री स्वामी चरित्र पठना सायं. ५.३० ते ६.०० औंदुबर प्रदक्षिणा
सायं. ६.३० वा. नैवद्य आरती सायं. ६.३० ते रात्री ८.०० खालील प्रमाणे नित्यसेवा करावी. श्री स्वामी समर्थ १ माळ,सामुदायिक जप, नित्यध्यान, गितेचा १५ वा अध्याय, मनाचे श्लोक वाचन, पसायदान, तुकारामाचा अभंग, विष्णु सहस्त्र नाम वाचन, बटूक भैरव हवन आयोजित करण्यात आलेले आहे
तसेच दिनांक २६ एप्रील २०२५, शनिवारला सायंकाळी ६ ते ९ पर्यंत महाप्रसाद आयोजित करण्यात आलेले आहे सोबतच स्वामी समर्थ केंद्र, धामणगाव रेल्वे येथे शिक्षण व्यवसाय, नोकरी, विवाह, संतती, आरोग्य, व्यसन, कर्ज वास्तू, कौटुंबीक व वैयक्तीक समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन तसेच आरती व प्रश्नोत्तरे त्रिकाळ आरती सकाळी ८.०० वा., १०.३० वा. सायंकाळी ६.३० वा. नैवेद्य आरती सप्ताहात प्रहरे महिला सेवेकरी सकाळी ८ ते सांयकाळी ८ पर्यंत पुरुष सेवेकरी सायंकाळी ८ ते दुसरे दिवशी सकाळी ८ पर्यंत प्रहरे व गुरुचरित्र पारायण करणारे सेवेकरी नोंदणी सुरु असल्याची माहिती आयोजक श्री स्वामी समर्थ सेवेकरी श्री. स्वामी समर्थ केंद्र, धामणगाव रेल्वे यांनी दिली आहे

veer nayak

Google Ad