श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस. ओ एस.कब्स येथे मोठ्या उत्साहात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला . रामनवमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे रामनवमी भगवान रामाच्या जन्माचा उत्सव आहे श्रीराम भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात. या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीराम च्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. प्रि. प्रायमरी हेड मा. शबाना खान आणि शिक्षीका प्रणिता जोशी यांनी रामनवमी विषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमामध्ये के. जी.1 चे विद्यार्थी सोमेश राठी श्रीराम च्या वेशभूषेत आणि सार्थक मुंधडा लक्ष्मणच्या वेशभूषेत आले होते आणि नर्सरी ची विद्यार्थिनी ध्रुवी जगधने माता सीतेच्या वेशभूषेत आली होती. प्रि. प्रायमरी हेड मा. शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रणिता जोशी, रेणुका सबाणे, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले , प्राजक्ता दारुंदे, श्रद्धा रॉय , अश्विनी नांदने यांनी सहकार्य केले.