आज दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी शिक्षकांसाठी दर्जेदार विडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चे जिल्हा स्तर पुरस्कार वितरण सोहळा डायट च्या हॉल मध्ये डायट चे प्रिंसीपल श्री कुबडे साहेब यांच्या अध्यक्षतेत तसेच बोर्ड अध्यक्ष श्री.अनिल साबळे साहेब, श्री मेश्राम साहेब, शिक्षणाधिकारी म.न.पा.डॉ. मोहरे साहेब शिक्षणाधिकारी जि. प.अमरावती श्री अनिल कोल्हे साहेब उपशिक्षणाधिकारी (माद्य.) जि. प. श्री निखिल मानकर उपशिक्षणाधिकारी (माध्य.) श्री मनवर साहेब उपनिरीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या पुरस्काराचे स्वरूप प्रथम 10000रु द्वितीय 9000 रु. व तृतीय 8000 रु रोख स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे होते.या स्पर्धेसाठी तालुका स्तर ,जिल्हा स्तर ,व राज्य स्तर असे तीन स्तर ठरविण्यात आले होते त्यापैकी तालुका स्तरावर 450 पुरस्कार देण्यात आले तर जिल्हा स्तरावर 70 पुरस्कार देण्यात आले त्यापैकी इंग्रजी विषयासाठी द्वितीय क्रमांक श्री कान्होजीबाबा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.अतुल ठाकरे सर यांनी तर इतिहास विषयातील द्वितीय क्रमांक याच कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.दीपक अंबरते सर यांनी मिळवला.
या पुरस्काराच्या निमित्याने मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानू इछितो कारण आमच्या चांगल्या कामाची दखल आमच्या माय बाप संस्था घेतातच.परंतु शासनाने अशाप्रकारची स्पर्धा आयोजित करून शिक्षकांचा सन्मान केला. अशा उपक्रमातून प्रोत्साहन मिळते .कार्यक्रमाचे आयोजन सुंदरच होते .या आयोजनासाठी पवन मानकर सर वरिष्ठ अधिव्याख्याता व त्यांच्या सहकाऱ्यांचे देखील आभार.
धन्यवाद
Home आपला विदर्भ अमरावती जिल्हास्तरीय दर्जेदार शैक्षणिक विडिओ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न (श्री.कान्होजीबाबा कनिष्ठ महाविद्यालयाला...