स्थानिक जुना धामणगाव / श्री गुरुदेव संस्कार वर्ग डॉक्टर एम के पवार शैक्षणिक संकुलामध्ये श्री गुरुदेव बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केली असून शिबिर 15 एप्रिल ते 24 एप्रिल ,या दहा दिवसीय शिबिरातून विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन सुरू आहे .
सकाळी उठून ध्यान, योगा ,सूर्यनमस्कार ,दुपारच्या सत्रामध्ये बौद्धिक तासिका मध्ये राष्ट्रप्रेम ,राष्ट्रीय एकात्मता, स्त्री पुरुष समानता ,अंधश्रद्धा,शिस्त, व्यसनाधीनता , आई वडिलांची सेवा,संत ,महात्मे ,थोर पुरुष, यांचे जीवन चरित्र इत्यादी विषयावर माहिती दिली जाते.सायंकाळी बौद्धिक खेळ शिकविले जाते. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक ,विकास होतो.सायंकाळी सामुदायिक प्रार्थना व कथाकथन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडली जात आहे. आज समाजामध्ये विद्यार्थी हा दिशाहीन झालेला आहे वाढते मोबाईलचे प्रमाण त्यामुळे विद्यार्थी सुसंस्काराच्या ऐवजी कुसंस्काराकडे वळत आहे .म्हणून आज सूसंस्कार शिबिर ही काळाची गरज झाली आहे .
याच उद्देशाने ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी संस्कार वर्गातून श्री गुरुदेव बाल सुसंस्कार शिबिराची निर्मिती केली असून या शिबिरामध्ये विद्यार्थी ज्ञानाचे धडे घेत आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने व वंदनीय संत गाडगे महाराज यांच्या प्रेरणेने या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भगवद्गीता, रामायण ,महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध ,ग्रामगीता या ग्रंथातील निवडक ओव्यांचा अभ्यास शिकवला जात आहे. शिबिराचे उद्घाटन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे व सहकारी शिक्षक महेश धांदे ,अंकुश डुकरे ,काजल मून,प्रणिता शेंडे इत्यादी व विद्यार्थी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. या शिबिराला सर्वांनी सहकार्य केले आहे. संस्थेचे सचिव शिवाजीराव पवार ,समन्वय जया केने,प्राचार्य मोहम्मद उज्जैन वाला , उपप्राचार्य दीप्ती हांडे यांनी विशेष विद्यार्थ्यांचे कौतुक केले. हनुमंत ठाकरे व त्यांचे सहकारी शिक्षक नव समाज घडविण्याचे महत्वाचे कार्य करीत आहे .रात्री राष्ट्रवंदना व निद्रापूर्व प्रार्थना होते.