से.फ.ला. विद्यालयाचे कलाशिक्षक अजय जिरापुरे यांचा धामणगाव रेल्वे तालुका मुख्याध्यापक संघ यांच्याद्वारे सत्कार..

0
25
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक- 15 एप्रिल 2025 ला धामणगाव रेल्वे तालुका मुख्याध्यापक संघ यांच्याद्वारे सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता..

                या सत्कार समारंभाचे अध्यक्ष – धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड. श्री. रमेशचंद्र चांडक तसेच कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती व प्रमुख अतिथी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री. प्रतापदादा अडसड तसेच प्रमुख अतिथी म्हणून अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. प्रवीणजी दिवे,अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव श्री. गजानन मानकर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती धामणगाव रेल्वेच्या श्रीमती सपनाताई भोगावकर, धामणगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. मिलिंद देशमुख, से.फ.ला.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.प्रशांत शेंडे हे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते..

                 या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती मा. श्री. आमदार प्रतापदादा अडसड तसेच या कार्यक्रमाचे सेवानिवृत्त सत्कारमूर्ती से.फ.ला. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. गणेश चांडक, कान्होजीबाबा विद्यालय, अंजनसिंगीचे माजी प्राचार्य श्री. भाऊराव गाढवे, साईबाबा विद्यालय, अंजनसिंगीचे माजी मुख्याध्यापक श्री. प्रकाश दातार.. यांचा उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार सोहळा पार पडला..

                   या कार्यक्रमांमध्ये अजय जिरापुरे यांचा कला शिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य करीत असल्याबद्दल सोबतच विद्यार्थ्यांवर नेहमीच चित्र संस्कार, विदयार्थ्यांना कला स्पर्धेसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन व प्रोत्साहन व अजय जिरापुरे यांच्या प्रेरणादायी शिकवणीमुळे विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विदयालयात विकास होत आहे. त्यांना कलेचा एक नवीन दृष्टिकोन मिळत आहे. सोबतच अजय जिरापुरे यांचा धामणगाव रेल्वे तालुक्यात नव्हे तर जिल्हा, राज्यात, राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कलेचा वेगळा ठसा उमटवल्याबद्दल, विविध पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल… याचा सार्थ अभिमान म्हणून या कार्यक्रम सोहळा मध्ये त्यांना तालुका मुख्याध्यापक संघ व प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले..

              या कार्यक्रमाला धामणगाव तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका आवर्जून उपस्थित होते.

veer nayak

Google Ad