भीमजयंती घेऊन आली नव्या युगाच्या आशा -आ.प्रताप अडसड

0
57
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे :- विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करताना आंबेडकरी जनतेच्या सेवेत खारीचा वाटा उचलला आला व त्यांनी दिलेल्या लोकशाहीनेच भीम जयंती नव्या युगाची आशा घेऊन येणारी ठरली आहे असे प्रतिपादन भीम जयंतीच्या निमित्ताने एका उद्घाटन प्रसंगी आमदार प्रताप अडसड यांनी केले.

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी जळका पटाचे येथे समाज मंदिर सभागृहाचे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले येवेळी ते बोलत होते.

विधानसभा सदस्य म्हणून काम करताना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करून मी कटिबद्ध आहे.त्यासाठी मला मतदारसंघाच्या सेवेची संधी मिळाली ही संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच मला दिली असल्याचे पुढे बोलताना अडसड म्हणाले. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने जुना धामणगावं येथील जीवक बुद्धविहार, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खिरसाना येथे आमदार प्रताप अडसड यांनी भेट देऊन तथागत भगवान गौतम बुद्ध व पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.दरम्यान स्थानिक आमदार विकास कार्यक्रम निधीतून अंदाजे सात लक्ष रुपयांच्या जळका पटाचे येथील समाज मंदिराचे लोकार्पण पार पडले.

यावेळी प्रमुख उपस्तीती श्री संभाजीदादा थुल तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नितीन मेश्राम तर निखील गवळी, रवि बिंदोड,दिनेश मोडक ,प्रफुल घरडे व समस्त बौध्द विहार कमेटीची प्रमुख उपस्थिती होती.जळका पटाचे ग्रामपंचायत सरपंच पराग रमेशराव राऊत,उपसरपंच राजेश मधुकरराव कदम,ग्रामपंचायत सदस्य अजयभाऊ बिंदोड, सौ. कुंदाताई अ.काळे,श्री सुरेंद्रभाऊ पंधरे,सौ.गोदावरीताई व. देशमुख,सौ.शालुताई दा. शेळके, सौ छायाताई रा.पनपालिया व जळका (पटाचे) येथील मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

veer nayak

Google Ad