आर्वीत महात्मा ज्योतीराव फुले याची जयंती साजरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-अजितदादा पवार विचाराचे प्रमुख पदाधिकारी जयंती उत्सवात सहभागी

0
67
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी : दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या 198 वि जयंती निमीत माळगान वॉर्ड आर्वी येथे महात्मा ज्योतीराव फुले चॅरिटेबल ट्रस्ट व क्रांतीज्योती ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले जयंती उत्सव समिती आर्वी द्वारा आयोजित कार्यक्रमात, जयंती उत्सव समीतीचे अध्यक्ष सुभाष वऱ्हेकर, सचिव विजयराव लंगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, आर्वी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर, आर्वी तालुका अध्यक्ष अशोकराव धानोरकर, आम आदमी पार्टी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजपाल भगत यांनी सहभागी होत महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून पूजन करण्यात आले.

यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार जनता नगर येथील बौद्ध विहार परिसरात असलेले भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याना, हारार्पण पूजन अभिवादन करण्यात आले तिथून सर्व मान्यवर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कार्यक्रमात सामील झालेत यावेळी इथे सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच उपस्थित मान्यवरानी पूजन केले, संचालन हरिभाऊ डेहनकर तर मान्यवर मंडळींनी मार्गदर्शन केले यावेळी प्रामुख्याने प्रहार सोशल फोरम चे बाळा जगताप, राष्ट्रवादी (अ.प) चे दिलीप पोटफोडे, आप चे राजपाल भगत, अडते व्यापारी अध्यक्ष अजय अग्रवाल, संचालक लखन अग्रवाल,माथाडी -चे दिलीप भुसारी कृषि उत्पन्न बाजार समितीचे विशाल येलेकर, यांनी विचार व्यक्त केले, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी. नप सदस्यां सौं सारिका लोखंडे, सविता आखरे,माजी नप सदस्य प्रफुल काळे, प्रशांत कांडलकर, पंकज लोखंडे, गजानन सोनटटके, प्रकाश पाचघरे,कुमार पाटील, श्री फसाटे, नरेंद्र वडणारे, व महातज्योतिबा फुले विचाराचे शेकडो अनुयायी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व कर्मचारी संचालक,उपस्थित होते

veer nayak

Google Ad