भगवान महावीरांच्या जीवन चरित्रावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत से.फ.ला. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश.

0
21
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी 

 धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भगवान महावीर स्वामी 2550 निर्वाण कल्यानक महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे राज्यस्तरीय भगवान महावीरांच्या जीवन चरित्रावर भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन दिनांक 20 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलेले होते. या निबंध स्पर्धेमध्ये धामणगाव येथील जैन पदाधिकाऱ्यामार्फत से.फ.ला. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला. ही निबंध स्पर्धा वर्ग 5 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली होती जवळपास से. फ. ला. विद्यालयातून 220 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता..

 जैन धर्माचे 24 वे तीर्थकार भगवान महावीर स्वामी यांना जैन धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. एक राजकुमार असूनही भगवान महावीर यांनी सत्याच्या शोधात आपल्या राज्यकारभाराचा त्याग केला होता त्यानंतर या थोर पुरुषाने जगाला अहिंसा व सत्याचा संदेश दिला स्वतःवर विजय मिळवणे हे लाखो शत्रूंवर विजय मिळवल्यासारखे आहे खरा शत्रू तुमच्या आतच राहतो तो शत्रू क्रोध, अभिमान आणि लोभ. त्याला आतून काढून टाका..देव इतरांशिवाय अस्तित्वात नाही. प्रत्येकाने योग्य दिशेने प्रयत्न केल्यास देवत्व प्राप्त होऊ शकते.. एखाद्याचे अस्तित्व नष्ट करण्याऐवजी त्याला शांततेने जगू द्या. म्हणजेच ” जियो और जीने दो ” हा मोलाचा भगवान महावीरांचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणी मार्फत निबंधामध्ये कोरला व भगवान महावीरांचे विचार व संदेश संपूर्ण जगाला प्रेरित करतात असे विद्यार्थ्यांनी त्यांचे निबंधामध्ये प्रामुख्याने दाखवून दिले..

             त्यानंतर या स्पर्धेच्या निकालानुसार से.फ.ला. विदयालयातील वर्ग 5 वा एफ ची विद्यार्थ्यांनी कु. तन्वी राहुल जैन हिने जिल्हयातून प्रथम क्रमांक पटकाविला.. तिला रोख रक्कम 5555 व प्रशस्तीपत्र तसेच कु.निलाक्षी रामदास खडसे वर्ग 6 वा ई हिने जिल्ह्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला. हिला रोख 2222 रुपये व प्रशस्तीपत्र हे मा. जिल्हाधिकारी श्री सौरभजी कटियार यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे सोबतच जैन धर्माचे पदाधिकारी यांच्याकडून सन्मान प्राप्त झाला.. याप्रसंगी जैन समाजातील फक्त प्रतिष्ठित नागरिक व शाळेतील शिक्षक उपस्थित होते..सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.. या यशाबद्दल धामणगाव एजुकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी तसेच से.फ.ला. विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्रचार्य प्रदीप मानकर, पर्यवेक्षक अनिल लाहोटी व विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे. व स्पर्धेच्या आयोजन समितीचे आभार मानले..

 दिनांक – 3 एप्रिल 2025 

 गुरुवार

veer nayak

Google Ad